IPL 2025: संजीव गोयंका यांनी रिषभ पंतला पुन्हा झापलं? पुन्हा दिसला KL राहुलसारखा प्रकार

Rishabh Pant Sanjiv Goenka, IPL 2025 LSG vs PBKS: संजीव गोयंकांचा संताप अन् रिषभ पंत खाली मान घालून ऐकत राहिला... पाहा काय घडलं

पंजाब किंग्जने बुधवारच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाला ८ गडी राखून पराभूत केले. लखनौने १७१ धावा केल्या होत्या. पण त्यांच्या गोलंदाजांना १७२ धावांचा बचाव करता आला नाही.

लखनौकडून निकोलस पूरनने ४४ तर आयुष बडोनीने ४१ धावा केल्या. संघाचा कर्णधार रिषभ पंत याने ५ चेंडू खेळून केवळ २ धावा केल्या आणि ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. 

फलंदाजीत सलग तिसऱ्यांदा अपयशी ठरल्यानंतर रिषभ पंतला संघाच्या फिल्डिंगच्या वेळीही कर्णधार म्हणून प्रभाव पाडता आला नाही. पंजाबने १७२ धावांचे आव्हान ४ षटके आधीच पूर्ण केले.

रिषभ पंतला LSG ने तब्बल २७ कोटींना विकत घेतले. पण त्याने पहिल्या सामन्यात १५ तर दुसऱ्या सामन्यात ० धावा केल्या. त्यामुळेच संघमालक संजीव गोयंका रागावले. फोटोही व्हायरल झाले.

गेल्या वर्षीच्या IPL मध्ये एका पराभवानंतर गोयंका त्यावेळचा LSG चा कर्णधार KL Rahul ला मैदानातच झापताना दिसले होते. त्यावरून बरीच चर्चा रंगल्याचेही पाहण्यात आले होते.

यंदाच्या हंगामासाठी जेव्हा रिषभ पंतवर मोठी बोली लागली, त्यावेळीच नेटकरी गोयंका यांच्या रागाबाबत बोलताना दिसले. यावर्षी राहुलच्या जागी पंत असेल अशाही गोष्टी बोलल्या गेल्या.

नेटकऱ्यांचा हा अंदाज आता हळूहळू खरा ठरताना दिसत आहे. पंतचा लखनौ संघ ३ पैकी दुसऱ्यांदा पराभूत झाला. त्यानंतर संजीव गोयंका आणि पंत यांचे काही फोटो व्हायरल झाले.

गोयंका यांनी पंतला दुसऱ्या पराभवानंतर पुन्हा झापले. ते पंतसोबत मैदानात संवाद साधताना निराश दिसले. पंतकडे हात दाखवीत ते काहीतरी बोलत होते आणि पंत खाली मान घालून ते ऐकत होता.

सामन्यानंतर व्हायरल झालेल्या या फोटोंबाबत चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. पंतचा फॉर्म लखनौसाठी चिंतेची बाब आहे, पण गोयंकांनी असे वागायला नको होते, असा सूर सोशल मीडियात दिसून आला.