IPL च्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या Uncapped Players ची यादी

IPL च्या इतिहासात अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंची सविस्तर माहिती

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात पंजाब किंग्जच्या ताफ्यातील सलामीवीर प्रभसिमरन सिंग हा कमालीची कामगिरी करताना दिसतोय.

पंजाब किंग्जच्या डावाची सुरुवात करताना त्याने सातत्यपूर्ण दमदार खेळीचा नजराणा पेश करताना ११ सामन्यात ४३७ धावा कुटल्या आहेत.

कामगिरीतील सातत्य कायम ठेवत अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा मोठा डाव साधण्याची त्याला संधी आहे. यशस्वीचा रेकॉर्ड मोडत टॉपर होण्यासाठी त्याला आणखी १८९ धावा कराव्या लागतील.

इथं एक नजर टाकुयात IPL च्या इतिहासात एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या अनकॅप्ड प्लेयर्सच्या खास रेकॉर्ड्सवर

IPL च्या आतापर्यंतच्या इतिहासात अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा यशस्वी जैस्वालच्या नावे आहे. २०२३ च्या हंगामात त्याने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना ६२५ धावा केल्या होत्या.

या यादीत ऑस्ट्रेलियन शॉन मार्श दुसऱ्या क्रमांकावर आहे. २००८ च्या हंगामात पंजाबकडून अनकॅप्ड प्लेअरच्या रुपात खेळताना त्याने ६१६ धावा केल्या होत्या.

२०२४ च्या हंगामात रियान परागचा जलवा पाहायला मिळाला होता. राजस्थानकडून अनकॅप्ड खेळाडूच्या रुपात त्याने या हंगामात ५६७ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.

ईशान किशन याने २०२० चा हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळताना अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात ५१६ धावा ठोकल्याचा रेकॉर्ड आहे.

या यादीत सूर्यकुमार यादवच्या नावाचाही समावेश आहे. २०१८ च्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून अनकॅप्ड खेळाडूच्या रुपात त्याने ५१२ धावा केल्याचे पाहायला मिळाले होते.