OG Crush Of IPL Fans : काव्या मारन आधी IPL मॅच वेळी चर्चित राहिलेला चेहरा; हैदराबादशीच होतं कनेक्शन!

जाणून घ्या काव्या मारन आधी हैदराबादच्या मॅचवेळी लक्षवेधी ठरलेल्या अन् IPL क्रशचा टॅग लागलेल्या चेहऱ्याबद्दल

आयपीएलमध्ये हैदराबादची मॅच असली की, काव्या मारन हा चेहरा नेहमीच चर्चेत असतो. सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीण प्रत्येक सामन्याला आपल्या संघाला प्रोत्साहन करण्यासाठी मैदानात हजेरी लावून लक्षवेधून घेताना दिसते.

कुणी तिला ब्युटी विथ ब्रेनचा टॅग लावते तर कुणी तिला IPL चाहत्यांमधील क्रश मानते.

पण तुम्हाला माहितीये का? आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामातही अशाच एका सुंदर चेहऱ्याची तुफान चर्चा व्हायची.

हा चेहराही चर्चेत यायचा ती मॅचही हैदराबाद फ्रँचायझी संघाचीच असायची. अनेकांना ती कोण असा प्रश्नही पडला असेल. जाणून घेऊया तिच्यासंदर्भातील खास गोष्टी

आयपीएलमधील हैदराबादच्या मॅच वेळी आपल्या खास अंदाजाने लक्षवेधून घेत पहिला क्रश ठरली ती म्हणजे गायत्री रेड्डी

हैदराबाद फ्रँचायझी संघ ज्यावेळी डेक्कन चार्जेसच्या नावाने ओळखला जायचा त्यावेळी हा चेहरा नेहमीच चर्चेत असायचा.

२००८ च्या पहिल्या हंगामात हैदराबाद फ्रँचायझी संघाची मालकी डेक्कन क्रॉनिकल होल्डिंग्ज या मीडिया ग्रुपकडे होती. या संघाला गायत्री रेड्डी नावाचा चेहरा कनेक्ट झाला.

डेक्कन क्रॉनिकलचे माजी अध्यक्ष टी. वेंकटराम रेड्डी यांची ती कन्या. तिच्याकडे संघ व्यवस्थापनाची सर्व सूत्रेही होती.

२१ सप्टेंबर १९८६ रोजी हैदराबाद येथे जन्मलेली गायत्री रेड्डी आयपीएलच्या प्रत्येक सामन्यावेळी डेक्कन चार्जर्स संघाला चीअर करण्यासाठी स्टेडियममध्ये हजेरी लावताना दिसायचे.