SRH ची 'ती' मिस्ट्री गर्ल कोण? मालकीण काव्या मारन अन् खास खेळाडूसोबतचा फोटो व्हायरल

SRH Mystery Girl with Kavya Maran photo viral: 'त्या' तरूणीबद्दल इंटरनेटवरदेखील सर्च केलं जात आहे, जाणून घ्या ती नक्की कोण आहे...

SRH Mystery Girl Photo viral with Kavya Maran: सनरायजर्स हैदराबाद संघाने शुक्रवारी रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. तुफान फटकेबाजीच्या जोरावर सलामीवीर अभिषेक शर्माने विजयाचा पाया रचला तर पुढील फलंदाजांनी विजय साकारला.

अभिषेक शर्माच्या खेळीचे सर्वत्र कौतुक झाले. त्याला सामनावीराचा किताबदेखील मिळाला. पण त्याबरोबरच सध्या त्याच्यासोबत आणि SRHची मालकीण काव्या मारनसोबत असलेल्या एका तरूणीची चर्चा रंगली आहे.

संघाची मालकीण असलेल्या काव्या मारनसोबत आणि सामनावीर ठरलेल्या अभिषेक शर्मासोबत फोटो काढायला मिळालेली ही तरूणी नक्की कोण, जाणून घेऊया.

सध्या सर्वजण इंटरनेटवर अभिषेकच्या बहिणीबाबत सर्च करताना दिसत आहेत. तिचा फोटो व्हायरल होत असतानाच सारे जण तिला क्यूट म्हणताना दिसत आहेत.

या २६ वर्षीय तरूणीचे नाव कोमल शर्मा आहे. कोमल ही अभिषेकची बहिण असून ती अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस आहे. कोमलच्या इन्स्टा बायोनुसार ती पेशाने डॉक्टर असल्याचे समजते.

अभिषेक अनेकदा आपल्या बहिणीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. अभिषेक जेव्हा कोणताही मोठा पराक्रम करतो त्यावेळी तो नेहमी त्याचे यश आणि आनंद आपल्या कुटुंबासोबत साजरा करतो.

अभिषेक शर्माला एक मोठी बहीण देखील आहे. तिचे नाव सानिया शर्मा आहे. परंतु सध्या सामन्याला हजेरी लावल्याने लहान बहीण कोमल हिची सोशल मीडियावर चर्चा आहे.