PHOTOS: अभिनेत्रीपेक्षा कमी नाही IPL मधील अँकर; बोल्ड लूकने घायाळ करणारी सौंदर्यवती

Swedha Singh: सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे.

सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे. या हंगामातील सुरुवातीचे ३० सामने पार पडले आहेत. सर्वच संघ चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असून प्लेऑफचे तिकीट मिळवण्यासाठी लढत आहेत.

आयपीएलचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. अनेकांना इच्छा असताना देखील तिकीट न मिळाल्याने सामन्याचा प्रत्यक्ष आनंद घेता येत नाही. खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्य देखील प्रेक्षक गॅलरीत चीअर करताना दिसले आहेत.

आयपीएलमध्ये समालोचन करत असलेल्या महिला अँकर्स खेळाडूंप्रमाणे सर्वांचे लक्ष वेधत असतात. त्यातीलच एक म्हणजे स्वेधा सिंग.

आज आपण आयपीएलचे सामने कव्हर करणारी अँकर स्वेधा सिंगबद्दल जाणून घेणार आहोत. ती तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमी चर्चेत असते.

स्वेधा केवळ आयपीएलच नाही तर क्रीडा क्षेत्रातील विविध स्पर्धांमध्ये दिसते. प्रो कबड्डीमध्ये देखील ती समालोचन करताना दिसते.

स्वेधाची समालोचन करण्याची शैली प्रेक्षकांना भुरळ घालणारी आहे.

स्वेधा सौंदर्याच्या बाबतीत एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीला टक्कर देईल अशी आहे. तिच्या फिटनेसमुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडते.

आयपीएलची एवढी क्रेझ आहे की या लीगशी जोडला जाणारा व्यक्ती प्रसिद्धीच्या झोतात येतो. असेच काहीसे स्वेधाच्या बाबतीत झाले.

स्वेधा स्टार स्पोर्ट्सवर आयपीएलचे समालोचन करत आहे. तिने स्टीव्ह स्मिथ यासारख्या अनेक खेळाडूंसोबत फोटो शेअर केला आहे.