"आम्ही 'ही' चूक केली अन् तिथेच सामना हातून निसटला..."; हार्दिक पांड्याने सांगितलं Mumbai Indians च्या पराभवाचं कारण

Hardik Pandya Mumbai Indians, IPL 2024 GT vs MI: पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर हार्दिक म्हणाला, "काही हरकत नाही..."

Hardik Pandya Mumbai Indians, IPL 2024 GT vs MI: मुंबई इंडियन्सने २०१३ पासून सुरु झालेली परंपरा कायम राखत सलामीचा सामना गमावला. गुजरात टायटन्सकडून मुंबईच्या संघाचा ६ धावांनी पराभव झाला.

हार्दिकने गुजरातला सोडचिठ्ठी देत मुंबईचे नेतृत्व केले. परंतु, नव्याने कर्णधार झालेल्या शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात मुंबईवर वरचढ ठरली. गुजरातने दिलेल्या १६९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सामना शेवटपर्यंत रंगला.

अनुभवी मुंबई इंडियन्स अखेरच्या क्षणाला गुजरातला पराभूत करेल असे वाटत होते. पण शुबमन गिलच्या गुजरातने मुंबईवर मात केली. या पराभवानंतर हार्दिक पांड्याने आपले मत व्यक्त करत असताना मुंबई इंडियन्स नक्की कुठे चुकली? याबद्दलही सांगितले.

"तिलक वर्मा चांगल्या फॉर्ममध्ये असतानाही त्याने टीम डेव्हिडला एक धाव काढून स्ट्राइक दिली. कदाचित तिलकच्या मते डेव्हिड जास्त चांगले फटके मारू शकला असता. पण काही हरकत नाही. आमच्याकडे आणखी १३ सामने आहेत, त्यात आम्ही चांगली कामगिरी करू."

चूक काय झाली? - "शेवटच्या ५ षटकांत ४२ धावा करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न केले. आमच्याकडून हे आव्हान पूर्ण व्हायला हवे होते, यात काहीच वाद नाही. पण आमची एक चूक झाली असं मला वाटतं."

"५ षटकांत ४२ धावा सहज करता येतील अशा भ्रमात आमचे फलंदाज होते. त्यामुळे काही चेंडू खेळून काढू असा प्रयत्न आम्ही केला. आणि आमच्या फलंदाजांची लय तुटली. त्याचाच आम्हाला फटका बसला."