Join us  

विक्रमच असा नोंदवला की, Sunil Narine आयपीएल इतिहासातील भारी खेळाडू ठरला!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 9:48 PM

Open in App
1 / 6

Sunil Narine याने आयपीएलमधील त्याच्या पहिल्या शतकासह मोठ्या विक्रमाची नोंद केली. रोहित शर्मा व शेन वॉटसन यांच्यानंतर आयपीएलमध्ये शतक व हॅटट्रिक नावावर असलेला तो तिसरा खेळाडू ठरला आहे. मात्र, आयपीएल इतिहासात आतापर्यंत कोणालाच न जमलेला विक्रमही नरीनने आज नावावर केला.

2 / 6

कोलकाताच्या ईडन गार्डनवर पुन्हा एकदा सुनील नरीन हे वादळ घोंगावले. Sunil Narine ने उत्तुंग फटकेबाजी करताना आयपीएलमधील त्याचे पहिले शतक पूर्ण केले. राजस्थानने नाणेफेक जिंकून यजमान कोलकाताला प्रथम फलंदाजीला बोलावले आणि आवेश खानने चौथ्या षटकात फिल सॉल्टला ( १०) माघारी पाठवले.

3 / 6

पण, सुनील नरीन व अंगक्रिश रघुवंशी ( ३० धावा, १८ चेंडू) यांनी ४३ चेंडूंत ८५ धावांची भागीदारी केली. कर्णधार श्रेयस अय्यरला ( ११) युझवेंद्र चहलने पायचीत केले. पण, नरीन काही ऐकणारा नव्हता आणि त्याने ५६ चेंडूंत १३ चौकार व ६ षटकारांसह १०९ धावा चोपल्या.

4 / 6

KKR कडून सेन्चुरी ठोकणारा तो तिसरा फलंदाज ठरला. १८व्या षटकात ट्रेंट बोल्टने अप्रतिम यॉर्कवर नरीनचा त्रिफळा उडवला. चहलने आज ५४ धावा देताना १ विकेट्स घेतल्या आणि ही त्याची आयपीएलमधील खराब कामगिरी ठरली. वेंकटेश अय्यर ८ धावांवर बाद झाला.

5 / 6

रिंकू सिंगने ९ चेंडूंत २० धावा चोपून कोलकाताला ६ बाद २२३ धावा उभारून दिल्या. आवेश खान व कुलदीप सेन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. नरीनने आजच्या खेळीत एकूण १९ चौकार-षटकार खेचले आणि KKR च्या फलंदाजाकडून ही दुसरी सर्वोत्तम ( ब्रेंडन मॅक्युलम, २३ ) कामगिरी आहे.

6 / 6

आयपीएल इतिहासात शतक व डावात पाच विकेट्स नावावर असलेला नरीन हा एकमेव खेळाडू आहे. त्याने २०१२ मध्ये १९ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या. ट्वेंटी-२०त असा पराक्रम करणारा तो सहावा खेळाडू आहे. फॅफ ड्यू प्लेसिस, जिम एलेन्बी, जोश कॉब, इम्रान फरहत व फ्रान्सिस्को कौआना यांचे नाव या लिस्टमध्ये आहे.

टॅग्स :आयपीएल २०२४कोलकाता नाईट रायडर्सराजस्थान रॉयल्स