Join us  

IPL 2024 Auction: कोण आहे मल्लिका सागर? करणार 333 स्टार क्रिकेटपटूंचा लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 4:24 PM

Open in App
1 / 8

Mallika Sagar IPL 2024 Auction : आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग पैकी एक मानली जाते. त्यामुळेच या स्पर्धेसाठी जेव्हा क्रिकेटपटूंचा लिलाव केला जातो, त्यावेळी सारेच त्याकडे लक्ष लावून बसलेले असतात.

2 / 8

यंदाचा लिलाव उद्या (१९ डिसेंबर) होणार आहे. या लिलावात काही गोष्टी पहिल्यांदाच घडणार आहेत. एक म्हणजे प्रथमच लिलाव भारताबाहेर दुबईत होणार आहे. तर दुसरे म्हणजे, पहिल्यांदाच पुरुषांच्या आयपीएल लिलावाची जबाबदारी एक भारतीय आणि त्यातही विशेष म्हणजे एक महिला घेणार आहे.

3 / 8

या मिनी लिलावात जवळपास २६३ कोटी रुपयांसाठी लिलाव प्रक्रिया पार पडणार असून, त्याची जबाबदारी एका भारतीय तरुणीवर आहे. या तरूणीचे नाव आहे मल्लिका सागर.

4 / 8

मल्लिकाने अलीकडेच महिला प्रीमियर लीगची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. तसेच मल्लिका सागरने 2023 च्या WPL लिलावाची जबाबदारीही योग्य रितीने हाताळली होती.

5 / 8

मुंबईतील आर्ट कलेक्टर असलेल्या मल्लिका सागरने WPL 2023 आणि 2024 या दोन्ही लिलावांचा कार्यक्रम नीट पार पाडला. ती क्रीडा विश्वात अतिशय प्रसिद्ध आहे.

6 / 8

48 वर्षीय मल्लिका सागरला लिलाव प्रक्रियांचा सुमारे 25 वर्षांचा अनुभव आहे आणि क्रिकेटपूर्वी तिने प्रो कबड्डी लीगच्या लिलावाचीही जबाबदारी पार पाडली आहे.

7 / 8

मुंबईतील प्रसिद्ध पुंडोल आर्ट गॅलरीमध्ये अनेक लिलाव प्रक्रिया तिने समर्थपणे पेलली आहे. खास गोष्ट म्हणजे वयाच्या 26 व्या वर्षी ती क्रिस्टीजची पहिली भारतीय लिलावकर्ती होती.

8 / 8

आयपीएलमध्ये चारू शर्माची जागा घेतली आहे. 2023 च्या लिलावामध्ये वैद्यकीय कारणांमुळे ह्यू एडमेड्स यांना लिलाव अर्ध्यावर सोडावा लागला होता. त्याजागी चारू शर्मा यांनी वेळ पूर्ण केली होती. पण ते पूर्ण वेळ लिलावकर्ते नव्हते. मल्लिका मात्र IPL 2024 पूर्ण लिलाव प्रक्रिया पार पाडणार आहे.

टॅग्स :आयपीएल २०२३ऑफ द फिल्डआयपीएल लिलाव