हुस्न की मलिका! IPL 2023 मध्ये दिसणार सौंदर्यवती अँकर; अखेरच्या फोटोपर्यंत हटणार नाही नजर

ipl 2023 : आजपासून जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीगला सुरूवात होत आहे.

आजपासून जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीगला सुरूवात होत आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलच्या १६व्या हंगामातील पहिला सामना होत आहे. आगामी आयपीएल हंगामात देखील ग्लॅमरचा तडका पाहायला मिळणार आहे.

यंदा विविध भाषांमध्ये महिला ॲंकर्स ॲंकरिंग करताना दिसणार आहेत. त्यामुळे महिला ॲंकरमुळे आयपीएलच्या सौंदर्यात आणखी भर पडत आहे.

महिला ॲंकर्सच्या यादीत यंदा देखील काही बड्या नावांचा समावेश आहे. त्यामुळे मैदानाबाहेर देखील चाहत्यांना मनोरंजन पाहायला मिळणार आहे.

महिला ॲंकरच्या यादीत रिद्धिमा पाठकचे नाव आघाडीवर आहे, जी १६व्या हंगामात हिंदी भाषेतून ॲंकरिंग करताना दिसणार आहे.

रिद्धीमाने यापूर्वी क्रिकेटशिवाय राष्ट्रकुल स्पर्धेत देखील ॲंकरिंगची भूमिका बजावली आहे.

याशिवाय सुप्रिया सिंग देखील ॲंकरिंग करताना दिसणार आहे. यापूर्वी तिने महिला प्रीमिअर लीगच्या लिलावात आपली झलक दाखवली होती. सुप्रिया आगामी हंगामात जियो सिनेमावर इंग्लिशमध्ये ॲंकरिंग करताना दिसणार आहे.

तसेच सुरूभी वेद्य देखील आपल्या ॲंकरिंगने चाहत्यांची मनं जिंकण्याच्या प्रयत्नात असेल. महिला प्रीमिअर लीगमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली सुरूभी जियो सिनेमावर ॲंकरिंग करणार आहे.

मूळची पंजाबमधील असलेली नसप्रीत कौर ॲंकरिंगच्या क्षेत्रातील एक मोठे नाव आहे.

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशने ॲंकरिंगच्या माध्यमातून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.