IPL 2023, Cricketer Life Story: गंगा नदीत उडी मारली, कसाबसा वाचला जीव... आता दिमाखात गाजवतोय IPLचं मैदान

काव्या मारनने तब्बल ८ कोटी ५० लाखांची बोली लावून त्याला संघात घेतलंय

IPL 2023, Cricketer Life Story: असं म्हणतात की मुलाचे पाय पाळणात दिसतात. आज आपण ज्या क्रिकेटबद्दल बोलत आहोत त्याची कथाही अशीच काहीशी आहे. वयाच्या ९ महिन्यांत जेव्हा त्याने प्लास्टिकची बॅट उचलली तेव्हा त्याच्या वडिलांना अनेकांनी सांगितलं की या मुलाला क्रिकेटर बनवा.

आज हाच खेळाडू IPLमध्ये खेळून कोट्यवधींचा मालक आहे. त्याची गणना करोडपती खेळाडूंमध्ये यादीत होते. IPL मध्ये भलेभले खेळाडू अनसोल्ड राहतात. अशा प्रचंड स्पर्धेत या खेळाडूवर तब्बल ८.५ कोटींची बोली लागली आणि आज हाच खेळाडू कोलकाताच्या गोलंदाजांचा नाकीनऊ आणू शकतो.

गंगा नदीत उडी मारून वाचलेला आणि लहानपणी बॅटने खिडकीच्या काचा फोडणारा हा खेळाडू आता IPL 2023 गाजवतोय. हा खेळाडू म्हणजे Rahul Tripathi. गेल्या सामन्यात राहुल त्रिपाठीने पंजाब किंग्जच्या गोलंदाजांना सळो की पळो केले होते. त्याने 48 चेंडूत नाबाद 78 धावा करत संघाला विजय मिळवून दिला होता.

IPL 2023 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. या सामन्यातही आपला मागील सामन्याचा फॉर्म कायम ठेवण्याचा राहुल त्रिपाठी प्रयत्न करेल. पण आता IPL गाजवणारा राहुल त्रिपाठी लहानपणी खूपच खोडकर होता.

राहुल त्रिपाठी क्रिकेटमधील जबरदस्त खेळाडू आहे. तो वाचन आणि लेखनातही प्रतिभासंपन्न आहे. शाळेतील पहिल्या ५ विद्यार्थ्यांमध्ये त्याची गणना नेहमीच होत असे. पण लहानपणी गावाला जायचे असेल आणि कुणी अडवलं तर तो चक्क खिडकीच्या काचा फोडायचा आणि पळून जायचा.

राहुल त्रिपाठीचे गणित अतिशय चांगले होते. त्यामुळे त्याला इंजिनिअर व्हायचे होते, पण क्रिकेटची ओढ असल्याने, तो क्रिकेटर बनला. पण तो लहानपणीही खूप खोडकर होता. एका रिपोर्टनुसार, राहुलने एकदा लहानपणी गंगा नदीत उडी मारली होती. तेथून तो मोठ्या कष्टाने वाचला होता.