Join us  

Suresh Raina IPL 2022 : CSKच्या विजयावर सुरेश रैनाने ट्विट केले; ऋतुराज, कॉनवे यांचे कौतुक केले, पण MS Dhoniचा उल्लेख टाळला!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2022 12:34 AM

Open in App
1 / 7

IPL 2022, CSK beat SRH by 13 runs : महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) कर्णधारपदी पुन्हा विराजमान होताच विजयही त्याच्या मागोमाग आले. चेन्नईने रविवारी सनरायझर्स हैदराबाद ( SRH) वर १३ धावांनी विजयाची नोंद केली.

2 / 7

ऋतुराज गायकवाड व डेवॉन कॉनवे यांच्या १८२ धावांच्या विक्रमी भागीदारीनंतर मुकेश चौधरीने ( ४ विकेट्स) कमाल केली. रवींद्र जडेजा व महिशा थिक्साना यांनी टिच्चून मारा करताना SRHच्या धावगतीवर वेसण घातले.

3 / 7

धोनीने कॅप्टन डोकं वापरून गोलंदाजांचा योग्य वापर केला अन् तसे क्षेत्ररक्षणही लावले. या विजयानंतर CSK चा माजी खेळाडू सुरेश रैना ( Suresh Raina) याने ट्विट केले. पण, त्यात MS Dhoni चे नाव कुठे नाही दिसले.

4 / 7

ऋतुराजने ५७ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांसह ९९ धावा केल्या. ऋतुराज व डेवॉन कॉनवे ( Devon Conway ) या जोडीने १८२ धावांची विक्रमी भागीदारी केली. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सर्वोत्तम भागीदारीचा विक्रम आता ऋतुराज व कॉनवे या जोडीच्या नावावर नोंदवला गेला आहे.

5 / 7

विराट व एबी यांचा १५७ धावांचा विक्रम आज मोडला गेला. कॉनवेने ५५ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ८५ धावा करताना चेन्नईला २ बाद २०२ धावांपर्यंत पोहोचवले. आयपीएलमध्ये सर्वाधिक २२ वेळा २००+ धावा करण्याचा विक्रम CSKने नावावर करताना RCB ला ( २१) मागे टाकले.

6 / 7

हैदराबादकडून केन विलियम्सन ( ४७), अभिषेक शर्मा ( ३९) या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. निकोलस पूरनने ३३ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ६४ धावा करून अखेरपर्यंत खिंड लढवली. पण, हैदराबादला ६ बाद १८९ धावा करता आल्या. मुकेश चौधरीने ४६ धावांत ४ विकेट्स घेतल्या. त्याने टाकलेल्या २०व्या षटकात २५ धावा आल्या. मिचेल सँटनर व ड्वेन प्रेटोरियस यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

7 / 7

टॅग्स :आयपीएल २०२२चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनीसनरायझर्स हैदराबादसुरेश रैना
Open in App