Join us  

IPL 2022: संघासाठी ज्यांनी खाल्ल्या खस्ता; त्यांनाच CSK दाखवणार बाहेरचा रस्ता? 'या' खेळाडूचं स्थान धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 6:02 PM

Open in App
1 / 8

जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग अशी आयपीएलची ख्याती. चेन्नई सुपर किंग्स या लीगमधील महत्त्वाचा संघ. सीएसकेनं आतापर्यंत सर्वाधिक वेळा प्ले ऑफमध्ये धडक दिली आहे.

2 / 8

आतापर्यंत ४ वेळा सीएसकेनं आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. पुढील वर्षासाठी मेगा ऑक्शन सुरू झालं असून त्यात एक संघ जास्तीत जास्त ४ खेळाडू रिटेन करू शकतो. त्यामुळे चेन्नईचा संघ कोणाला संघात कायम राखणार याकडे लक्ष लागलं होतं.

3 / 8

सीएसकेच्या संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. या संघाचं सरासरी वयदेखील इतर संघांपेक्षा अधिक आहे. त्यामुळेच सीएसकेला डॅड्स आर्मी म्हटलं जातं. मात्र याच खेळाडूंनी संघाला अनेकदा जेतेपद पटकावून दिलं, संकटातून बाहेर काढलं.

4 / 8

पुढील वर्षी आयपीएलमधील संघांचा चेहरामोहरा बदलले. त्यामुळे चेन्नईचा संघ कोणाला कायम राखणार आणि कोणाला नारळ देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. याबद्दलची अधिकृत घोषणा आज रात्री अपेक्षित आहे. मात्र सीएसके दोन दिग्गज खेळाडूंना नारळ देणार हे निश्चित झालं आहे.

5 / 8

ESPNcricinfo नं दिलेल्या वृत्तानुसार, सीएसके कर्णधार महेंद्र सिंह धोनीसह अष्टपैलू रविंद्र जाडेजा, मोईन अली आणि ऋतुराज गायकवाड यांना रिटन करणार आहे. ऋतुराजनं २०२१ च्या आयपीएलमध्ये सर्वाधिक ६३५ धावा करत ऑरेंज कॅप पटकावली. त्यामुळे गायकवाडला सीएसकेनं संघात कायम ठेवलं आहे.

6 / 8

धोनीच्या नेतृत्त्वाखाली सीएसकेचा संघ चॅम्पियन संघ म्हणून ओळखला जाऊ लागला. मात्र सीएसकेच्या या यशात मोठा वाटा असलेल्या दोन खेळाडूंना सीएसकेनं संघात ठेवलेलं नाही.

7 / 8

मिस्टर आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनानं सीएसकेसाठी अनेकदा शानदार कामगिरी केली आहे. षटकार ठोकण्यात पटाईत असलेल्या रैनानं संघाला अनेकदा संकटातून बाहेर काढलं आहे. २०५ सामन्यांत त्याच्या नावावर ५ हजार ५२८ धावा आहेत. एका फायनलचा अपवाद सोडता, सीएसकेनं खेळलेल्या सगळ्याच फायनलमध्ये रैना होता. मात्र त्याला रिटेन करण्यात आलेलं नसल्याचं वृत्त आहे.

8 / 8

फॅफ ड्युप्लेसिसनं सीएसकेला २०२१ च्या फायनलमध्ये एकहाती विजय मिळवून दिला. त्यानं अंतिम सामन्यात ८६ धावांची खेळी केली होती. आतापर्यंत आयपीएलमध्ये १०० सामन्यांत त्यानं २ हजार ९३५ धावा केल्या आहेत. मात्र सीएसके त्यालाही रिटेन करणार नसल्याचं वृत्त आहे.

टॅग्स :आयपीएल २०२१महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्ससुरेश रैना
Open in App