Join us  

Virat Kohli Vs Nitin Menon, IPL 2022 RCB vs PBKS Live : विराट कोहली विरुद्ध अम्पायर नितीन मेनन सामना पुन्हा रंगला, 'त्या' निर्णयावर कोहली नाराज दिसला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 9:38 PM

Open in App
1 / 8

IPL 2022 T20 Match RCB vs PBKS Live Updates : फॅफ ड्यू प्लेसिनने ( Faf du Plessis) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात धुरळा उडवला. अनुज रावत, विराट कोहली व दिनेश कार्तिक यांनीही दमदार खेळी करताना पंजाब किंग्ससमोर २०६ धावांचे लक्ष्य ठेवले.

2 / 8

युवा फलंदाज अनुज रावतला सोबत घेऊन सुरूवातीला त्याने RCBचा मजबूत पाया रचला. त्यानंतर विराट कोहली ( Virat Kohli) सोबत मिळून पंजाब किंग्सच्या ( PBKS) गोलंदाजांना अक्षरशः चोपून काढले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६१ चेंडूंत ११८ धावांची भागीदारी करून RCB ला मोठी धावसंख्या उभारून दिली.

3 / 8

दिनेश कार्तिकने अखेरच्या षटकांत हात धुवून घेतले आणि त्याने विराटसह १७ चेंडूंत नाबाद ३७ धावांची भागीदारी केली. RCB ने २ बाद २०५ धावा केल्या. कार्तिकने १४ चेंडूंत ३२ धावा, तर विराटने २९ चेंडूंत ४१ धावा चोपल्या. पण, डावाच्या अखेरच्या चेंडूवर अम्पायर नितीन मेनन यांच्या निर्णयावर विराट व दिनेश कार्तिक नाराज दिसले.

4 / 8

फॅफ ड्यू प्लेसिस व अनुज रावत यांनी RCBला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. अनुज २१ धावांवर राहुल चहरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.

5 / 8

आयपीएलमध्ये २०० डाव खेळणारा तो तिसरा भारतीय ठरला. रोहित शर्मा ( २०९ डाव) या विक्रमात आघाडीवर आहे. विराट व सुरेश रैना यांनी २०० डाव खेळले आहेत. फॅफ व विराट यांनी हरप्रीत ब्रारने टाकलेल्या १४व्या षटकात २१ धावा कुटल्या. फॅफने दोन, तर विराटने एक षटकार खेचला.

6 / 8

RCBचा कर्णधार म्हणून पदार्पणातच फॅफने अर्धशतक झळकावले आणि आयपीएलमध्ये ३०००+ धावांचा पल्ला ओलांडला. ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, डवे्हिड वॉर्नर, शेन वॉटसन, किरॉन पोलार्ड यांच्यानंतर असा पराक्रम करणारा फॅफ हा सहावा परदेशी फलंदाज ठरला.

7 / 8

फॅफ व विराट यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी केली. ७ धावांवर जीवदान मिळालेला फॅफ ५७ चेंडूंत ३ चौकार व ७ षटकारांच्यासह ८८ धावांवर माघारी परतला. दिनेश कार्तिकने दमदार खेळ करताना विराटसह RCB ला २ बाद २०५ धावांचा डोंगर उभा करून दिला. या मैदानावरील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. यापूर्वी २०११मध्ये दिल्लीने ७ बाद १९० धावा केल्या होत्या.

8 / 8

संदीप शर्माने २०वे षटक फेकले आणि अखेरच्या चेंडूवर दिनेश कार्तिक स्ट्राईकवर होता. कार्तिक पहिला स्टम्पवर येऊन फटका मारण्यासाठी सरसावला अन् संदीपने तो चेंडू त्याच्यापासून लांब फेकला. दिनेशने Wide देण्याची मागणी केली, परंतु तोच बराच बाहेर आल्यामुळे अम्पायर नितीन मेनन यांनी बाय हा सिग्नल दिला. विराट कोहली हे सर्व पाहत होता आणि तो नितीन मेनन यांना इशाऱ्याने विचारू लागला. तो या निर्णयावर नाराज दिसला. याआधीही विराट व नितीन मेनन यांच्यात वाद झाल्याच्या घटना आहेत.

टॅग्स :आयपीएल २०२२विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरएफ ड्यु प्लेसीसपंजाब किंग्सदिनेश कार्तिक
Open in App