Join us  

AB De Villers on Virat Kohli, IPL 2022: विराट यंदाच्या सीझनमध्ये किती धावा करेल? एबी डिव्हिलियर्स म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 6:30 PM

Open in App
1 / 7

AB De Villiers on Virat Kohli, IPL 2022: RCB चे दोन आधारस्तंभ म्हणजे विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स. गेली अनेक वर्षे हे दोघे एकत्र खेळत होते. या दोघांची मैत्री साऱ्यांनीच पाहिलेली आहे.

2 / 7

गेल्या वर्षी IPL संपल्यानंतर विराटने RCBचं कर्णधारपद सोडलं. त्यानंतर काही महिन्यातच एबीडीने IPL सकट सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.

3 / 7

त्यामुळे यंदा एबी डिव्हिलियर्स IPL मध्ये खेळताना दिसत नाहीये. पण विराट कोहली मात्र RCBमध्ये फलंदाज म्हणून खेळतोय. या दरम्यान विराट यंदाच्या हंगामात किती धावा करेल, याची भविष्यवाणी डिव्हिलियर्सने केली.

4 / 7

विराट त्याचा नवा साथीदार फाफ डू प्लेसिस याच्यासोबत चांगल्या लयीत दिसला. पहिल्या सामन्यात या दोघांनी दमदार फलंदाजी करत मोठी भागीदारी केली. महत्त्वाचे म्हणजे विराट शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि संघाला द्विशतकी मजल मारून दिली.

5 / 7

विराटबद्दल बोलताना ABD म्हणाला, 'फाफ डू प्लेसिस कर्णधार झाल्याने एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे आता विराटच्या डोक्यावरून कर्णधारपदाचं ओझं उतरलंय. त्यामुळे विराट तुफानी खेळी करेल याची मला खात्री आहे.'

6 / 7

विराटमध्ये मोठ्या खेळी करण्याची क्षमता आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात मी विराटकड़ून दमदार फलंदाजीची अपेक्षा ठेवली आहे. मला असं वाटतं की यंदाच्या हंगामात विराट किमान ६०० धावांचा टप्पा नक्कीच ओलांडेल', असं एबीडी म्हणाला.

7 / 7

'विराटच्या अनुभवाचा फाफ डू प्लेसिसला फायदाच होईल. फाफ स्वत: देखील खूप चांगला कर्णधार आहे. त्यामुळे तो नक्कीच विराट आणि इतर युवा खेळाडूंना मुक्तपणे खेळण्याचं स्वातंत्र्य देईल. RCB यंदा कशी कामगिरी करेल याचा अंदाज बांधणं कठीण आहे पण काही खेळाडू मात्र नक्कीच आपली चमक दाखवतील', असा विश्वास डिव्हिलियर्सने व्यक्त केला.

टॅग्स :आयपीएल २०२२विराट कोहलीएबी डिव्हिलियर्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App