Join us  

IPL 2022 Mega Auction: ७ वर्षांच्या बंदीनंतर खेळाडूचे पुनरागमन, ४२ वर्षीय खेळाडूही आजमावणार नशीब, बंगालचे क्रीडा मंत्रीही खेळणार; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2022 5:21 PM

Open in App
1 / 8

IPL 2022 Player Auction list announced : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी १२ व १३ फेब्रुवारीला मेगा ऑक्शन होणार आहे आणि त्यात ५९० खेळाडूंवर दहा फ्रँचायझी बोली लावणार आहेत. या ५९० खेळाडूंमध्ये ३७० भारतीय आणि २२० परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

2 / 8

जाणून घ्या कोणत्या देशातील किती खेळाडू - अफगाणिस्तान - १७, ऑस्ट्रेलिया - ४७, बांगलादेश - ५, इंग्लंड - २४, आयर्लंड - ५, न्यूझीलंड २४, दक्षिण आफ्रिका - ३३, श्रीलंका - २३, वेस्ट इंडिज- ३४, झिम्बाब्वे - १, नामिबिया - ३, नेपाळ - १ , स्कॉटलंड २, अमेरिका - १

3 / 8

यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ४२ वर्षीय फिरकीपटू इम्रान ताहीर हा सर्वात वयस्कर खेळाडू आहे, तर अफगाणिस्तानचा नूर अहमद ( १७ वर्ष) हा युवा खेळाडू आहे. नूर अहमदने १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत ६ विकेट्स घेतल्या आहेत. श्रीसंत व अमित मिश्रा हे भारतीय वयस्कर खेळाडू आहेत.

4 / 8

भारताचा माजी गोलंदाज एस श्रीसंत यानंही मेगा ऑक्शनसाठी नाव नोंदवले आहे. २०१३च्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात त्याच्यावर ७ वर्षांची बंदी घातली गेली होती आणि तो आता पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. त्यानं आयपीएलमध्ये ४४ सामन्यांत ४० विकेट्स घेतल्या आहेत.

5 / 8

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा बेबी एबी म्हणजेच डेव्हॉल्ड ब्रेव्हिस यानं दमदार कामगिरी केली. त्यानंही मेगा ऑक्शनसाठी नाव नोंदवले आहे आणि तो RCB चा फॅन आहे. त्याला २० लाखांची बेस प्राईज मिळाली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं ५ सामन्यांत ३६८ धावा केल्या आहेत.

6 / 8

ड्वेन ब्राव्होनं हा आयपीएलचे १५ पर्व खेळणारा पहिला परदेशी खेळाडू आहे. २००८ ते २०२१ पर्यंत तो प्रत्येक आयपीएलचा भाग राहिला आहे. एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल व शॉन मार्श हेही २००८ ते २०२१ मध्ये खेळले आहेत, परंतु यंदा ते खेळणार नाहीत.

7 / 8

मागील पर्वात १५ कोटींचा भाव घेणाऱ्या कायले जेमिन्सननं यंदा माघार घेतली आहे. त्याच्याशिवाय १४ कोटी घेणाऱ्या झाय रिचर्डसन, ४.८ कोटी घेणारा डॅन ख्रिस्टियनसह ख्रिस मॉरिस, एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल हेही यंदाच्या पर्वात खेळणार नाहीत.

8 / 8

पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री मनोज तिवारी यानंही मेगा ऑक्शनसाठी नाव नोंदवलं आहे. ५० लाख बेस प्राईजच्या ब्रॅकेटमध्ये त्याला संधी दिली गेली आहे. २०१८ मध्ये तो किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळला होता.

टॅग्स :आयपीएल २०२१आयपीएल लिलावख्रिस गेलजोफ्रा आर्चरश्रीसंत
Open in App