आता ही किंमत प्रत्येकी २ हजार कोटी रुपये इतकी ठेवण्याचा निर्णय झाला आहे.’ आयपीएलच्या आर्थिक व्यवहाराकडे लक्ष ठेवणाऱ्या सुत्रांनी सांगितल्यानुसार लिलाव प्रक्रिया आखलेल्या योजनेनुसार पुढे गेल्यास बीसीसीआयला किमान ५ हजार कोटी रुपयांचा फायदा होईल. कारण अनेक कंपन्यांनी लिलाव प्रक्रियेसाठी उत्सुकता दर्शविली आहे.
सध्या आयपीएलमध्ये दिल्ली आणि पंजाब हे दोन उत्तर भारतातील संघ आहेत. स्टार स्पोर्ट्सनं दिलेल्या आकडेवारीनुसार आयपीएलला मिळणाऱ्या एकूण ४ मिलियन प्रेक्षक व्ह्यूअर्सपैकी ६५% व्ह्यूअर्स हे हिंदी भाषिक प्रदेशातील आहेत. सध्या सुरू असलेल्या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील ५०.७% व्ह्युअर्सही याच भागातील आहेत. रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे तीन संघ दक्षिण भारतातील आहेत.
InsideSportनं दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयनं गुवाहाटी, रांची, कटक, अहमदाबाद, लखनौ व धर्मशाला या शहरांची नावं शॉर्टलिस्ट केली आहेत. अहमदाबाद हे एका संघासाठीचे प्रबळ दावेदार आहेत, तर दुसऱ्या संघासाठी गुवाहाटी व लखनौ यांच्या काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. पुढील महिन्यात याबाबची सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून नव्या संघासाठी २००० कोटी ही बेस प्राईज ठेवण्यात आली आहे.
नव्या संघांच्या समावेशानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) तब्बल ५ हजार कोटी रुपयांची घसघशीत कमाई होण्याची माहिती मिळाली आहे. बीसीसीआयच्या सुत्रांनुसार, ‘कोणतीही कंपनी १० लाख रुपयांच्या किमतीवर लिलाव कागदपत्रे विकत घेऊ शकते. सुरुवातीला दोन्ही नव्या संघांचे आधारमूल्य प्रत्येकी १,७०० कोटी रुपये इतके ठरविण्यात आहे.