why Faf du Plessis wear pink gloves? IPL 2022 MI vs RCB Live Updates : फॅफ ड्यू प्लेलिस 'गुलाबी' ग्लोव्हज का घालतो माहित्येय?; कारण जाणताच कराल सलाम

IPL 2022 Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Live Updates : मुंबई इंडियन्सने विजयासाठी ठेवलेल्या १५२ धावांच्या प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १ बाद १०२ धावा केल्या आहेत.

IPL 2022 Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Live Updates : मुंबई इंडियन्सने विजयासाठी ठेवलेल्या १५२ धावांच्या प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १ बाद १०२ धावा केल्या आहेत. फॅफ ड्यू प्लेसिस व अनुज रावत यांच्या अर्धशतकी भागीदारीनंतर रावत व विराट कोहली यांनीही ५०+ धावा जोडल्या. फॅफ या सामन्यात १६ धावांवर माघारी परतला, परंतु त्याच्या गुलाबी ग्लोव्हजने सर्वांचे लक्ष वेधले...

संकटात सापडलेल्या मुंबई इंडियन्ससाठी आज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) धावला... रोहित शर्मा व इशान किशन यांनी पहिल्या विकेटसाठी ५० धावा जोडल्यानंतर पुढील २९ धावांत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ६ विकेट्स घेतल्या. त्यामुळे बिनबाद ५० वरून मुंबईची अवस्था ६ बाद ७९ अशी झाली.

सूर्यकुमार यादवचे आगमन झाले आणि सामन्याचे चित्रच बदलले. सूर्यकुमार यादवने ७व्या विकेटसाठी जयदेव उनाडकतसह ४१ चेंडूंत ७२ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने ३६ चेंडूंत ५ चौकार व ६ षटकारांसह ६८ धावा चोपल्या. जयदेव १३ धावांवर नाबाद राहिला. या दोघांनी मुंबईला ६ बाद १५१ धावांपर्यंत पोहोचवले.

इशान किशन ( २६), रोहित शर्मा ( २६), डेवॉल्ड ब्रेव्हिस ( ८), तिलक वर्मा (०), किरॉन पोलार्ड ( ०) व रमणदीप सिंह ( ६) हे आज अपयशी ठरले. RCB कडून हर्षल पटेल ( २-२३) व वनिंदू हसरंगा ( २-२८) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. ग्लेन मॅक्सवेलने एक अप्रतिम रन आऊट केला आणि आकाश दीपने एक बळी टिपला.

प्रत्युत्तरात अनुज रावत ( Anuj Rawat ) आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी पहिले षटक संयमाने खेळून काढल्यानंतर दुसऱ्या षटकानंतरच फटकेबाजी सुरू केली. रावतने दुसऱ्या षटकात जयदेव उनाडकतला मारलेले दोन खणखणीत षटकार डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. रावतची फटकेबाजी आणि फॅफचा संयमी खेळ याने मुंबईचे गोलंदाज हैराण झाले होते. या दोघांनी ८ षटकांत ५० धावा फलकावर चढवल्या. उनाडकतने ९व्या षटकात फॅफल ( १६) बाद केले.

गुलाबी रंग हा फॅफ लकी समजतो आणि त्याच्या स्पॉन्सर्स IXU Sports कंपनीचा लोगोही याच रंगाचा आहे. पण, यापलिकडे 'स्तनाच्या कर्करोगाबाबत जागरूकता' करण्यासाठी तो गुलाबी रंगाचे ग्लोव्हज व बॅटची ग्रीप वापरतो.