Shreyas Iyer , IPL 2022 : श्रेयस अय्यर बनणार कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार?; समोर आले चार मोठे अपडेट्स

IPL 2022च्या मेगा ऑक्शनसाठी आता महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे, परंतु त्याआधी मोठे अपडेट्स समोर येत आहेत.

IPL 2022च्या मेगा ऑक्शनसाठी आता महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे, परंतु त्याआधी मोठे अपडेट्स समोर येत आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीला बीसीसीआयकडून अखेर मान्यता मिळाली आणि लखनौ फ्रँचायझी पाठोपाठ अहमदाबादनेही त्यांचे ३ खेळाडू जवळपास निश्चित केले आहेत. तेच इयॉन मॉर्गनला रिलीज करणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सनंही या पर्वासाठी त्यांचा कर्णधार निश्चित केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार कोलकाता नाइट रायडर्स १५व्या पर्वात भारताचा युवा खेळाडू आणि दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यासाठी सज्ज आहेत. आयपीएल मेग ऑक्शनमध्ये KKR श्रेयससाठी मोठी बोली लावण्याच्या तयारीत आहेत.

याशिवाय लखनौ फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सच्या दोन माजी खेळाडूंवर लक्ष ठेऊन आहेत. ते मार्कस स्टॉयनिस आणि कागिसो रबाडा यांना आपल्या ताफ्यात घेण्यासाठी उत्सुक आहेत. लखनौचा कर्णधार म्हणून लोकेश राहुलचे नाव आघाडीवर आहे.

अहमबादबाद फ्रँचायझीनं हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्सच्या या माजी खेळाडूसाठी अहमदाबाद फ्रँचायझी उत्सुक आहे. त्याच्या व्यतिरिक्त ही फ्रँचायझी राशिद खान व इशान किशन यांनाही ताफ्यात दाखल करून घेऊ शकतात.

आयपीएल २०२२चा ऑक्शन बंगळुरू येथे पुढील महिन्याच्या ११ ते १३ तारखेच्या आत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.