Jofra Archer will play IPL 2022?; Mumbai Indiansच्या दारावर आनंदाची बातमी धडकणार, जोफ्रा आर्चर-जसप्रीत बुमराह याचवर्षी सोबत खेळताना दिसणार!

IPL 2022 Auction Mumbai Indians : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी पार पडलेल्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने ज्या प्रकारे रणनीती खेळली, ते पाहून सर्वच थक्क राहिले.

IPL 2022 Auction Mumbai Indians : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी पार पडलेल्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने ज्या प्रकारे रणनीती खेळली, ते पाहून सर्वच थक्क राहिले. पहिल्या दिवशी त्यांनी इशान किशन ( Ishan kishan) साठी सर्वाधिक १५.२५ कोटींची बोली लावली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चर ( Jofra Archer) ८ कोटी मोजले.

अन्य फ्रँचायझींनाही इंग्लंडचा गोलंदाज हवा होता, परंतु त्यांच्याकडे तेवढे पैसे उतरले नव्हते आणि मुंबईने खास त्याच्यासाठी पैसे राखून ठेवले होते. जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत बुमराह ही जोडी एकत्र एकाच संघाकडून गोलंदाजी करताना पाहण्यासाठी मुंबई इंडियन्सचे चाहते उत्सुक आहेत. त्यांचे हे स्वप्न याच वर्षी पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई इंडियन्सच्या दारावार गोड बातमी येऊन धडकणार आहे. दुखापतीमुळे जोफ्रा आर्चर यंदाच्या आयपीएलला मुकणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळेच जेव्हा जोफ्राला संघात घेतले तेव्हा मालक आकाश अंबानी यांनी ही भविष्यातील गुंतवणूक असल्याचे स्पष्ट केले होते.

त्याचवेळी त्यांनी जोफ्रा व बुमराह या जोडीला सोबत खेळताना पाहण्याचा आनंद निराळाच असेल असेही म्हटले होते. त्यांना यासाठी पुढच्या वर्षीची वाट पाहावी लागणार नाही. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने ( ECB) जोफ्रा आर्चरबाबत घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी आधी जोफ्राला आयपीएल २०२२ त खेळण्यास परवानगी दिली नव्हती.

आता आर्चरच्या कोपऱ्याचा पुन्हा स्कॅन होणार आहे. लंडनमधील वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ECB जोफ्राच्या दुखापतीची पुन्हा तपासणी करणार आहेत आणि कदाचित IPL 2022 च्या काही सामन्यांना त्याला खेळण्याची परवानगी देऊ शकतात. मुंबई इंडियन्सने ८ कोटी रुपये मोजून २६ वर्षीय गोलंदाजाला आपल्या ताफ्यात घेतले आणि २०२३ व २०२४ या पर्वात तो मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे.

The Daily Telegraph ने दिलेल्या वृत्तानुसार ECB त्यांच्या आधीच्या निर्णयाचा पुनर्विचार करणार आहे. जोफ्राच्या कसोटी संघात पुनरागमनासाठी ECB कोणतीच घाई करू इच्छित नाही, परंतु ट्वेंटी-२०त खेळण्यास काहीच हरकत नाही. जोफ्रा आर्चर The Hundred लीगमध्ये खेळणार आहे आणि त्याला आयपीएलचे काही सामने खेळण्याची परवानगी दिली जाऊ शकते, असेही The Daily Telegraphच्या वृत्तात म्हटले आहे.

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, इशान किशन ( १५.२५ कोटी), डेवॉल्ड ब्रेव्हिस ( ३कोटी), बासील थम्पी ( ३० लाख), मुरुगन अश्विन ( १.६० कोटी), जयदेव उनाडकट ( १.३० कोटी), मयंक मार्कंडे ( ६५ लाख) , एन तिलक वर्मा ( १.७० कोटी), संजय यादव ( ५० लाख), जोफ्रा आर्चर ( ८ कोटी), डॅनिएल सॅम्स ( २.६० कोटी), टायमल मिल्स ( १.५० कोटी) ,टीम डेव्हिड ( ८.२५ कोटी), अनमोलप्रीत सिंग ( २० लाख), रमणदीप सिंग ( २० लाख), आर्यन जुयल ( २० लाख), रिले मेरेडिथ ( १ कोटी), मोहम्मद अर्षद खान ( २० लाख), हृतिक शोकीन ( २० लाख), फॅबियन अॅलन ( ७५ लाख), आर्यन जुनाल ( २० लाख), अर्जुन तेंडुलकर ( ३० लाख), राहुल बुद्धी ( २० लाख).