Join us  

RCB New Captain : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नवा कर्णधार ठरला; विराट कोहलीच्या संघाने घेतला MS Dhoniच्या खास भीडूचा सहारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 3:01 PM

Open in App
1 / 8

Indian Premier Legaue 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी सर्व फ्रँचायझींनी संघबांधणी केली आहे. कागदावर तरी सर्वच्या सर्व १० संघ तगडे दिसत असले तरी मैदानावर त्यांची प्रत्यक्ष कामगिरी कशी होते, याची सर्वांना उत्सुकता आहे. लखनौ व अहमदाबाद या दोन नव्या फ्रँचायझींच्या आगमनामुळे सर्वच संघांना नव्यानं संघबांधणी करावी लागली.

2 / 8

काहींनी नवे कर्णधारही निवडले. कोलकाता नाइट रायडर्सनेही ( KKR) श्रेयस अय्यर हा त्यांचा कर्णधार असेल हे जाहीर केले. हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सचे, तर लोकेश राहुल लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व सांभाळणार आहे. अशात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे ( Royal Challangers Bangalore) कर्णधारपद कोणाकडे जाते, याची उत्सुकता होती आणि त्यासाठीचे नाव आता जवळपास निश्चित झाले आहे.

3 / 8

आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये RCBने काही नव्या चेहऱ्यांसह अनुभव खेळाडूंनाही आपल्या ताफ्यात घेतले. त्यातीत एक नाव म्हणजे फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf du Plessis )... चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK) हा स्टार सलामीवीर आता यंदाच्या पर्वापासून RCBसोबत खेळणार आहे.

4 / 8

विराट कोहलीने ( Virat Kohli) RCBचे कर्णधारपद सोडल्यानंतर त्यासाठी ग्लेन मॅक्सवेल हे नाव आघाडीवर होते. पण, लिलावात फॅफ सारखा अनुभवी खेळाडू गळाला लागल्यानंतर RCBची लॉटरीच लागली. त्यामुळे RCBनेही दक्षिण आफ्रिकेच्या माजी कर्णधाराकडे संघाचे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

5 / 8

ग्लेन मॅक्सवेल लग्नामुळे आयपीएलच्या सुरूवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. ''फॅफ ही योग्य निवड आहे, परंतु याबाबतचा निर्णय घेण्यासाठी आमच्याकडे पुरेसा वेळ आहे. मॅक्सवेलच्या उपलब्धतेबाबत ठोस माहिती हातात येण्याची आम्ही वाट पाहत आहोत. सध्यातरी तो आयपीएलचे सुरुवातीचे सामने मुकण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत फॅफ हाच योग्य पर्याय आहे,''असे RCBच्या सूत्रांनी InsideSport ला सांगितले.

6 / 8

फॅफकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा पुरेसा अनुभव आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे तो आयपीएलच्या पूर्ण पर्वासाठी उपलब्ध असणार आहे.

7 / 8

आयपीएल २०२२ मधील कर्णधार - चेन्नई सुपर किंग्स - महेंद्रसिंग धोनी, मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा, दिल्ली कॅपिटल्स - रिषभ पंत, राजस्थान रॉयल्स - संजू सॅमसन, सनरायझर्स हैदराबाद - केन विलियम्सन, गुजरात टायटन्स - हार्दिक पांड्या, कोलकाता नाइट रायडर्स - श्रेयस अय्यर, लखनौ सुपर जायंट्स - लोकेश राहुल, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - फॅफ ड्यू प्लेसिस ( अद्याप अधिकृत घोषणा नाही), पंजाब किंग्स - शिखऱ धवन ( घोषणा नाही. )

8 / 8

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फाफ डू प्लेसिस ( ७ कोटी), हर्षल पटेल ( १०.७५ कोटी), वानींदू हसरंगा ( १२.२५ कोटी), दिनेश कार्तिक ( ५.५० कोटी), जोश हेझलवूड ( ७.७५ कोटी), शाहबाज अहमद ( २.४० कोटी) , अनुज रावत ( ३.४० कोटी), आकाश दीप ( २० लाख), महिपाल लोमरोर ( ९५ लाख), फिन अॅलेन ( ८० लाख), शेर्फाने रुथरफोर्ड ( १ कोटी), जेसन बेहरेनडॉर्फ ( ७५ लाख), सुयश प्रभुदेसाई ( ३० लाख), चामा मिलिंद ( २५ लाख), अनीश्वर गौतम ( २० लाख), लवनिथ सिसोदिया ( २० लाख), सिद्धार्थ कौल ( ७५ लाख), कर्ण शर्मा ( ५० लाख), डेव्हिड विली ( २ कोटी).

टॅग्स :रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरआयपीएल २०२२विराट कोहलीग्लेन मॅक्सवेलएफ ड्यु प्लेसीस
Open in App