IPL 2022 CSK : चेन्नई सुपर किंग्सच्या दारात आली 'वरात', Ruturaj Gaikwadचा डान्स जोरात; पाहा कोण आहे नवरी!

इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या धुमधडाक्यात चेन्नई सुपर किंग्सच्या दारात वरात आलेली पाहायला मिळतेय...

इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या धुमधडाक्यात चेन्नई सुपर किंग्सच्या दारात वरात आलेली पाहायला मिळतेय...

चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर काही व्हिडीओ व फोटो पोस्ट करून ही गोड बातमी त्यांच्या फॅन्सना दिली आहे.

या व्हिडीओत ऋतुराज गायकवाडसह CSKचे खेळाडू भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. किम वॉटसन ही CSKची सून बनणार आहे, पण नवरदेव कोण माहित्येय...

ऑक्शनमध्ये CSKने न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवे याला १ कोटींत आपल्या ताफ्यात घेतले आणि त्याच्याच लग्नाची ही तयारी आहे.

कॉनवेने २० आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांत ५०.१६च्या सरासरीने ६०२ धावा केल्या आहेत आणि नाबाद ९९ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे.

कॉनवेच्या लग्नाआधीचा सोहळा नुकताच पार पडला आणि खास चेन्नईच्या पारंपरिक वेशात CSKचे सर्व खेळाडू दिसले.

डेव्हॉन कॉनवेचा जन्म दक्षिण आफ्रिकेतला परंतु तो न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करतो.

२३ जुलै २०२०मध्ये त्याने गर्लफ्रेंड किम वॉटसनसोबत साखरपुडा केला आणि आता या दोघांची लग्नगाठ बांधली जाणार आहे.

३० वर्षाच्या कॉनवेने नोव्हेंबर २०२०मध्ये न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

मॅथ्यू सिनक्लेअर यांच्यानंतर कसोटी पदार्पणात द्विशतक झळकावणारा कॉनवे हा न्यूझीलंडचा दुसरा, तर जगातला सातवा फलंदाज ठरला.

कॉनवेच्या या खडतर प्रवासात किमची साथ खूप महत्त्वाची ठरली. ती त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली.