Join us  

IPL 2022 Auction : CSK तीन वर्षांसाठी महेंद्रसिंग धोनीला कायम राखणार; जाणून घ्या लखनौचा कर्णधार कोण होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 10:11 AM

Open in App
1 / 7

IPL 2022 Auction : इंडियन प्रीमिअर लीग २०२२ ( Indian Premier League 2022) मध्ये दहा संघ खेळणार असल्यामुळे जानेवारीत मेगा ऑक्शन होणार आहे. त्यासाठी बीसीसीआयनं ८ फ्रँचायझींना त्यांच्या ताफ्यातील चार खेळाडूंना कायम राखण्याची मुभा दिली आहे. ८ फ्रँचायझींना दोन परदेशी, दोन भारतीय किंवा तीन भारतीय व एक परदेशी किंवा दोन भारतीय, १ परदेशी व एक अनकॅप खेळाडू असे चार खेळाडू कायम राखता येणार आहेत.

2 / 7

चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) महेंद्रसिंग धोनीला ( MS Dhoni) रिटेन करणार असल्याचे आधीच जाहीर केले होते, त्यात इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार CSK तीन वर्षांसाठी धोनीला कायम ठेवणार आहे. त्याच्यासह अष्टपैलू रवींद्र जडेजा व सलामीवीर ऋतुराज गायकवाड यांना पसंती आहे. परदेशी खेळाडू म्हणून मोईन अलीला प्राधान्य दिलं जाईल, पण त्यानं खेळण्यास नकार दिल्यास सॅम कुरनला CSK रिटेन करेल.

3 / 7

३० नोव्हेंबरपर्यंत फ्रँचायझींना त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे बीसीसीआयला सांगायची आहेत. त्यानंतर रिलीज केलेल्या खेळाडूंमधून अहमदाबाद व लखनौ या नव्या फ्रँचायझी काही खेळाडूंना करारबद्ध करतील. CSK सुरेश रैनाला कायम राखण्याची शक्यता कमी आहे. अशात तो लखनौकडून खेळताना दिसू शकतो.

4 / 7

दिल्ली कॅपिटल्स यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत, अष्टपैलू अक्षर पटेल, पृथ्वी शॉ आणि जलदगती गोलंदाज अॅनरीच नॉर्ट्जे यांना कायम राखण्याची शक्यता आहे. अशात आर अश्विन, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, शिखर धवन ही स्टार नाव संघातून गायब असतील. DCचे नेतृत्व रिषभच सांभाळेल.

5 / 7

मुंबई इंडियन्सचा विचार केल्यास रोहित शर्मा व जसप्रीत बुमराह ही त्यांची पहिली पसंती असेल. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू किरॉन पोलार्ड याच्याशी सध्या चर्चा सुरू आहे. इशान किशनलाही ते रिटेन करू शकतात आणि सूर्यकुमार यादवला लिलावात पुन्हा मोठी बोली लावून ताफ्यात घेण्याचा त्यांचा मानस आहे.

6 / 7

संजिव गोएंकाचा RPSG Group आणि CVC Capitals हे काही अव्वल खेळाडूंना ताफ्यात घेण्यास उत्सुक आहेत. गोएंकाची लखनौ फ्रँचायझी लोकेश राहुलला कर्णधार बनवण्याच्या तयारीत आहे. राहुलनं पंजाब किंग्ससोबत करार मोडल्याचे वृत्त आहे.

7 / 7

कोलकाता नाइट रायडर्स दोन अष्टपैलू खेळाडू सुनील नरीन व आंद्रे रसेल यांना रिटेन करण्याच्या तयारीत आहेत. वरुण चक्रवर्थी हा त्यांचा तिसरा पर्याय आहे. शुबमन गिल किंवा वेंकटेश अय्यर यांच्यापैकी कोणाला कायम ठेवायचे, याचा निर्णय KKRनं अद्याप घेतलेला नाही.

टॅग्स :आयपीएल २०२१महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्स
Open in App