Jason Roy, IPL 2022 : जेसन रॉयची अनपेक्षित माघार, Gujarat Titans आता सुरेश रैनाला करारबद्ध करणार? ५ खेळाडूंची नावं चर्चेत

IPL 2022, Gujarat Titans : इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय ( Jason Roy) याने इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि गुजरात टायटन्सला ( Gujarat Lions) मोठा धक्का बसला.

IPL 2022, Gujarat Titans : इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय ( Jason Roy) याने इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि गुजरात टायटन्सला ( Gujarat Lions) मोठा धक्का बसला. Indian Premier League 2022मध्ये पदार्पण करण्यासाठी उत्सुक असलेल्या गुजरात टायटन्स आता जेसन रॉयच्यी रिप्लेसमेंट शोधण्याच्या तयारीला लागला आहे आणि काही चाहत्यांनी सुरेश रैनाचे ( Suresh Raina) नाव सुचवले आहे. त्याच्याशिवाय पाच नावंही चर्चेत आहेत.

बेन मॅकडेर्मोट - ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमधील हा स्टार खेळाडू गुजरात टायटन्ससाठी सक्षम पर्यात ठरू शकतो. त्याने BBLच्या ११ व्या पर्वात ५७७ धावा कुटल्या. हरिकेन्स संघाच्या या सलामीवीराने BBLमध्ये सलग दोन शतकं झळकावली आणि BBL इतिहासात असा पराक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरला. ऑस्ट्रेलियाच्या श्रीलंकेविरुद्धच्या ४-१ अशा विजयातही २७ वर्षीय मॅकडेर्मोटचा मोलाचा वाटा होता.

मार्टीन गुप्तील - न्यूझीलंडच्या या सलामीवीराला यंदाच्या लिलावात कोणीच बोली लावली नाही. त्याने आयपीएलच्या १३ सामन्यांत फार ग्रेट कामगिरी केलेली नाही. पण, तो एकदा फॉर्मात परतला की त्याला रोखणे भल्याभल्या गोलंदाजांना अवघड बनून बसते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.

डेविड मलान - इंग्लंडचा हा फलंदाज गुजरात टायटन्ससाठी सलामीला चांगला पर्यात ठरू शकतो. राष्ट्रीय संघासाठी तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. २०२१मध्ये त्याने पंजाब किंग्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याला फक्त एकच सामन्याची संधी मिळाली. पण, आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त त्याने ३५ सामन्यांत १२३९ धावा केल्या आहेत.

येनमन मलान - दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर मलान याने १४ वन डेत ७५९ व ११ ट्वेंटी-२०त २४१ धावा केल्या आहेत. क्विंटन डी कॉक आणि मलान ही जोडी सलामीसाठी गुजरात टायटन्सला फायदेशीर ठरू शकते.

स्टीव्ह स्मिथ - ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये कमाल दाखवू शकतो यात दुमत नाही. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर १०३ सामन्यांत २४८५ धावा आहेत. त्याच्या नेतृत्वकौशल्याचा फायदा हार्दिक पाड्यासाठी मदतशीर ठरू शकतो.

सुरेश रैना - सुरेश रैनाला २०२१च्या आयपीएलमध्ये साजेशी कामगिरीही करता आली नाही. रैनाने १२ सामन्यांत १६० धावाच केल्या होत्या. एकूण आयपीएलमध्ये २०५ सामन्यांत ३२.५१च्या सरासरीने ५५२८ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक व ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय त्याने २५ विकेट्सही घेतल्या आहेत. रैनाने ५०६ चौकार व २०३ षटकार खेचले आहेत आणि १०८ झेलही टिपले आहेत.