Join us  

IPL 2021 : खेळाडूच नव्हे, तर आयपीएलमध्ये संजना, नताशा अनुष्कासह 'या' सहा ग्लॅमरस चेहऱ्यांची हवा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 2:53 PM

Open in App
1 / 6

अनुष्का शर्मा ( Anushka Sharma ) - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याची पत्नी अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) ही आयपीएलमध्ये नेहमी चर्चेत असते. २०१७मध्ये विराट-अनुष्कानं लग्न केलं आणि नुकतंच ही जोडी आई-बाबा बनली. वामिका असे त्यांच्या कन्येचं नाव आहे. त्यामुळे आयपीएल सामन्यात अनुष्कासह वामिकालाही पाहण्यासाठी विराटचे फॅन उत्सुक आहेत.

2 / 6

संजना गणेशन ( Sanjana Ganesan) - मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) यानं नुकतंच स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन ( Sanjana Ganesan) हिच्यासोबत लग्न केलं. आता बुमराहच्या आयपीएलमधील कामगिरीनंतर संजना चर्चेत आली तर आश्चर्य वाटायला नको. संजना मॉडेलही आहे.

3 / 6

नताशा स्टँकोव्हिच ( Natasa Stankovic) - हार्दिक पांड्यानं २०२०च्या सुरुवातीलाच सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. लॉकडाऊनच्या काळात हार्दिक व नताशानं घरातील मोजक्याच सदस्यांच्या साक्षीनं लग्नही केलं आणि त्यांना अगस्त्या नावाचा लहान मुलगाही आहे. नताशा नेहमीच तिच्या ग्लॅमसर फोटोनी सोशल मीडियावर चर्चेत असते.

4 / 6

धनश्री वर्मा ( Dhanashree Verma) - कोरीओग्राफर, डॉक्टर धनश्री वर्मानं भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याच्यासोबत नुकतंच लग्न केलं. या दोघांची सोशल मीडियावर हवा असतील.

5 / 6

कॅन्डीस वॉर्नर ( Candice Warner) - सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याची पत्नी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. वॉर्नरसोबतचे तिचे टिकटॉक व्हिडीओ तुफान गाजले होते.

6 / 6

जॅसीम लोरा ( Jassym Lora) - अमेरिकन मॉडल जॅसीम लोरा हिनं आंद्रे रसेलसोबत लग्न केलं.

टॅग्स :आयपीएल २०२१अनुष्का शर्मानताशा स्टँकोव्हिचसंजना गणेशन