Join us  

IPL 2021: याड लागलं रं...! जिच्या फोटोवर लाखो तरुण घायाळ; SRH ची मिस्ट्री गर्ल आहे कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 5:10 PM

Open in App
1 / 10

आयपीएल सिजनच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मात्र यात स्पर्धेतही सनराइजर्स हैदराबादची सुमार कामगिरी सुरुच आहे. बुधवारी खेळल्या गेलेल्या IPL मॅचमध्ये दिल्लीनं हैदराबादला ८ विकेटनं हरवलं.

2 / 10

मात्र दिल्ली कॅपिटल आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्या मॅचवेळी एका मिस्ट्री गर्लची तुफान चर्चा सुरु आहे. हैदराबादच्या जर्सीत SRH टीमला चिअर करण्यासाठी ही तरुणी क्रिकेटच्या मैदानात दिसून आली. मॅच कव्हर करणारे कॅमेरेही या मुलीचे हावभाव अनेकदा टिपून घेत होते.

3 / 10

ही मिस्ट्री गर्ल दुसरी तिसरी कुणी नसून सनराइजर्स हैदराबादच्या सीईओ काव्या मारन(Kavya Maran) आहेत. टीमच्या खराब कामगिरीनंतर काव्या निराश झालेली पाहायला मिळाली. मॅचवेळी दिल्ली कॅपिटलच्या खेळाडूंद्वारे मारलेले प्रत्येक मोठ्या फटक्यानंतर टीव्ही स्क्रीनवर काव्या मारनचा चेहरा दाखवला जात होता.

4 / 10

त्याच कारणानं सोशल मीडियावर सध्या काव्याचे फोटो चर्चेत आले आहेत. नेटिझन्स त्यांच्या फोटोवर अनेक कमेंट्स करत आहेत. काव्या मारन या सन ग्रुपचे मालक कलानिधी मारन यांची मुलगी आहे. सनराइजर्स हैदराबाद टीमची मालकी सन ग्रुपकडे आहे.

5 / 10

काव्या मारन ही कलानिधी मारन यांची मुलगी आणि माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारन यांची पुतणी आहे. सनराइजर्स हैदराबादच्या अनेक मॅचमध्ये काव्या टीमला चिअर करताना दिसून आली आहे. २८ वर्षीय काव्या मारन स्वत: सन म्युझिक कंपनीची मालक आहे.

6 / 10

काव्या पहिल्यांदा २०१८ मध्ये सनराइजर्स हैदराबाद टीमला चिअर करण्यासाठी स्टेडिअमला आली होती. ती या टीमची सीईओ आहे. काव्याने MBA शिक्षण पूर्ण केल्यानंतर वडील कलानिधी मारन यांच्या व्यवसायात मदत करण्यासाठी पुढे आली. काव्याने कंपनीत मोठं पद घेण्यापूर्वी सन टीव्ही नेटवर्कमध्ये इंटर्नशिप केली होती.

7 / 10

काव्या सध्या सन टीव्ही नेटवर्कच्या ओटीटी प्लॅटफॉर्म सन नेक्स्ट Sun NXT ची प्रमुख आहे. काव्याला क्रिकेट खूप आवडतं. काव्याने चेन्नईहून एमबीए शिक्षण पूर्ण केले आहे. आता तिचा सर्व फोकस आयपीएलवर आहे. वडिलांच्या व्यवसायात मदत करण्यासाठी तिने MBA शिक्षण घेतलं.

8 / 10

सनराइजर्स हैदराबादच्या प्रत्येक चढउतारात सीईओ काव्या मारन नेहमी टीमच्या पाठिशी खंबीर उभी राहिली आहे. काव्याचे फोटो पाहून अनेक चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. टीव्ही स्क्रीनवर दिसणारा काव्याचा चेहरा सोशल मीडियात खूप व्हायरल होत आहेत.

9 / 10

दिल्ली कॅपिटल्सने शानदार विजय मिळविताना सनरायझर्स हैदराबादचा आठ गड्यांनी पराभव केला. गोलंदाजांच्या जोरावर हैदराबादला २० षटकांत ९ बाद १३४ धावांत रोखल्यानंतर दिल्लीकरांनी १७.५ षटकांत २ बाद १३९ धावा करून बाजी मारली.

10 / 10

सामना सुरू होण्याच्या काही तासांआधी वेगवान गोलंदाज टी. नटराजन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने हैदराबाद संघाला धक्का बसला. यानंतर त्यांना दिल्लीच्या वेगवान मारा सहन करता आला नाही. धावांचा पाठलाग करताना अनुभवी धवनने छाप पाडली

टॅग्स :आयपीएल २०२१दिल्ली कॅपिटल्ससनरायझर्स हैदराबाद
Open in App