Join us  

IPL 2021: कोहलीचा पराभव नक्की, एमएस धोनीसाठी २५ एप्रिल तारीख आहे लकी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 3:38 PM

Open in App
1 / 9

आयपीएलमधला आजचा सामना सुरु होण्याआधीच विराट कोहलीचा पराभव निश्चित असल्याचं नेटिझन्सनी मत व्यक्त करायला सुरुवात केली आहे. यामागचं कारण आहे आजची तारीख. होय २५ एप्रिल तारीख महेंद्रसिंग धोनीसाठी खूप नशीबवान ठरली आहे.

2 / 9

IPL मध्ये CSK नं आजवर २५ एप्रिल रोजी एकूण ६ सामने खेळले आहेत आणि या सर्व सामन्यांमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाला विजय प्राप्त करता आला आहे. २०१० साली २५ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध सामना खेळला होता आणि सामन्यात चेन्नईला विजय प्राप्त करता आला होता.

3 / 9

त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजेच २०११ साली २५ एप्रिल रोजी चेन्नई सुपरकिंग्ज संघानं पुणे वॉरियर्स इंडिया संघाचा पराभव केला होता.

4 / 9

२०१३ साली २५ एप्रिल रोजी CSK चा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध झाला होता आणि याही सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जनं विजय प्राप्त केला होता.

5 / 9

२०१४ साली CSK ची लढत २५ एप्रिल रोजी पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स विरुद्ध झाली होती. याही सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जनं विजय प्राप्त केला होता.

6 / 9

पुढच्याच वर्षी 2015 मध्ये CSK नं पंजाब किंग्स विरुद्ध २५ एप्रिल रोजी सामना खेळला आणि जिंकला होता.

7 / 9

२५ एप्रिल रोजी म्हणजेच आजच्याच दिवशी याआधी २०१८ साली सीएसके आणि आरसीबीची लढत झाली होती. याही सामन्यात चेन्नई सुपरकिंग्ज संघानं बंगलोरच्या संघाला पराभूत केलं होतं. त्यानंतर आज पुन्हा एकदा २५ एप्रिल याच तारखेला आरसीबी आणि सीएसकेचा सामना होत आहे.

8 / 9

चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील आजचा सामना वानखेडेच्या मैदानात खेळविण्यात येत असून चेन्नईनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. वानखेडेवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय होतो अशी आकडेवारी आहे.

9 / 9

चेन्नई सुपरकिंग्जनं आज संघात काही महत्वाचे बदल देखील केले आहेत. फिरकीपटू इमरान ताहीर याला संघात दाखल केलं आहे तर अष्टपैलू ड्वेन ब्राव्होचंही संघात पुनरागमन झालं आहे.

टॅग्स :आयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमहेंद्रसिंग धोनी