Join us  

IPL 2021: यंदा चेन्नईच पटकावणार आयपीएलचं जेतेपद?; जुळून आलेत धोनीशी निगडीत 'हे' दोन मोठे योगायोग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 4:23 PM

Open in App
1 / 9

आयपीएलच्या १४ व्या सीझनच्या अंतिम फेरीत चेन्नई सुपरकिंग्ज संघानं धडक मारली आहे. तर अंतिम फेरीत प्रवेश करणारा दुसरा संघ १३ ऑक्टोबर रोजी कळणार आहे. यासाठी दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्या चुरस आहे.

2 / 9

धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपरकिंग्जच्या नावावर आयपीएल स्पर्धेची एकूण तीन जेतेपदं नावावर आहेत. पण यंदाच्या सीझनसाठी धोनी आणि चेन्नई संघाशी निगडीत दोन अनोखे योगायोग जुळून आले आहेत. यामुळेच यंदाचं जेतेपद चेन्नईच पटकावणार असल्याची चर्चा सोशल मीडियात सुरु झाली आहे.

3 / 9

आजपासून बरोबर १० वर्षांपूर्वी म्हणजेच २०११ साली आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायर लढतीत चेन्नईसमोर १७० हून अधिक धावांचं लक्ष्य होतं. यात चेन्नईनं २ चेंडू शिल्लक राखून लक्ष्य गाठलं होतं आणि स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

4 / 9

महेंद्रसिंग धोनीनं त्या सामन्यात मॅच विनिंग खेळी साकारली होती. यात धोनीनं १ षटकार आणि तीन चौकार लगावले होते. त्या वर्षी धोनीच्याच चेन्नई सुपरकिंग संघानं आयपीएलचं जेतेपद पटकावलं होतं.

5 / 9

यंदाची असाच योगायोग जुळून आला आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या क्वालिफायर लढतीत धोनीच्या संघानं १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग केला. या सामन्यातही धोनीनं महत्त्वाची कामगिरी बजावली. विशेष म्हणजे धोनीनं ६ चेंडूत १८ धावा कुटल्या यात १ षटकार आणि तीन चौकारांचा समावेश होता. त्यामुळे आता इतिहासाची पुनरावृत्ती होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

6 / 9

चेन्नई सुपर किंग्ज संघ यंदा पुन्हा एकदा चॅम्पियन होण्यामागे दुसरा एक मोठा योगायोग म्हणजे दिल्ली कॅपिटल्स संघाच्या पराभवाशी निगडीत आहे.

7 / 9

दिल्ली कॅपिटल्सचा संघ आजवर जेव्हा जेव्हा 'क्वालिफायर वन' सामन्यात पराभूत झाला आहे. त्या त्या वेळी दिल्लीला पराभूत करणाऱ्या संघानच आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे.

8 / 9

२०१२ साली दिल्ली कॅपिटल्स संघाला कोलकाता नाइट रायडर्स संघानं 'क्वालिफायर-वन' सामन्यात पराभूत केलं होतं. त्यावेळी कोलकाताच्याच संघानं स्पर्धेचे जेतेपद पटकावलं होतं. तर २०२० साली मुंबई इंडियन्स संघानं दिल्ली कॅपिटल्सचा 'क्वालिफायर-वन' लढतीत पराभव केला होता. मुंबईनं मग स्पर्धेच्या जेतेपदावरही कब्जा केला होता.

9 / 9

यंदा पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्ससोबत त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघानं 'क्वालिफायर वन' लढतीत दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केलं आहे. पण अद्याप यंदाच्या सीझनचा अंतिम सामना होणं बाकी आहे. त्यामुळे चेन्नई सुपरकिंग्जचा संघ जेतेपद पटकावून पुन्हा एकदा योगायोग जुळवून आणणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

टॅग्स :आयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्सदिल्ली कॅपिटल्स
Open in App