Join us  

IPL 2021: कोरोनानं आयपीएलचं 'बायो-बबल' कसं भेदलं? कारण कळालं, सर्वच झाले हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 2:23 PM

Open in App
1 / 10

आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघातील वरुण चक्रवर्थी आणि संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आयपीएलचा आजचा कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगोलर यांच्यातील सामना रद्द करण्यात आला आहे.

2 / 10

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही बीसीसीआयनं बायो-बबलच्या नियमांवर विश्वास ठेवून आयपीएल सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. कोरोनाचा धोका वाढत असल्याचं लक्षात येताच बायो-बबलच्या नियमांमध्ये आणखी काही कडक निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत.

3 / 10

बायो-बबलमध्ये खेळाडूंना निर्धारित ठिकाणीच वावरण्याची परवानगी देण्यात येते. या संपूर्ण ठिकाणाचं सॅनिटायझेशन आणि तर सर्व सुरक्षा व्यवस्था पडताळलेली असते. त्यात खेळाडूंना हॉटेल बाहेरुन काहीच ऑर्डर करता येत नाही किंवा बायो बबलमधील व्यक्तींना वगळून इतर कुणाचीही भेट घेता येत नाही.

4 / 10

बायो बबलचे इतके कडक नियम असतानाही कोलकाताच्या संघात कोरोनाचा शिरकाव नेमका कसा झाला? असा प्रश्न सर्वांना पडला. त्यामागचं कारण आता समोर आलं आहे.

5 / 10

ईएसपीएन क्रीक इन्फोनच्या माहितीनुसार वरुण चक्रवर्थीच्या खांद्याला दुखापत झाली होती. खांद्याच्या स्कॅनिंग चाचणीसाठी वरुण चक्रवर्थी संघ व्यवस्थापनाच्याच अधिपत्याखाली अधिकृतरित्या बायो-बबलच्या बाहेर गेला होता. याच ठिकाणाहून त्याला कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता आहे.

6 / 10

वरुण चक्रवर्थीच्या खांद्याच्या दुखापतीमुळे स्कॅनिंग चाचणीनंतर तो पुन्हा बायो-बबलमध्ये सामील झाला होता. पण खेळाडूंच्या नियमित कोरोना चाचणीत त्याचा अहवाल पॉझिटव्ह आला आहे. त्यासोबतच संदीप वॉरियरला देखील लागण झाली आहे.

7 / 10

वरुण आणि संदीप यांच्या तीनवेळा चाचण्या केल्या गेल्या. यात तिनही वेळेस दोघांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे बीसीसीआयला मोठा धक्का बसला. दोन्ही खेळाडूंसोबत गेल्या काही दिवसांत जास्तीत जास्त वेळ घालवलेल्या खेळाडूंवर आता बीसीसीआयची मेडिकल टीम लक्ष ठेवून आहे.

8 / 10

कोलकाताच्या संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यानं आजच्या सामन्यातून कोरोनाचं थैमान वाढू नये याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सामना रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे. आज होणारा केकेआर विरुद्ध आरसीबी सामना आता पुढे ढकलण्यात आला आहे.

9 / 10

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएलमधून काही खेळाडूंनी याआधीच माघार देखील घेतली होती. यात ऑस्ट्रेलियाच्या लियाम लिव्हिंगस्टोन, अॅडम झम्पा, केन रिचर्डसन यांचा समावेश आहे.

10 / 10

दरम्यान, देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाही आयपीएल सुरू असल्यामुळे टीका देखील होत आहे. त्याला न जुमानता बीसीसीआयनं स्पर्धा सुरूच राहणार असल्याची भूमिका याआधीच जाहीर केली आहे. बीसीसीआयनं सर्व खेळाडूंची जबाबदारी घेतली आहे. पण आता कोरोनानं आयपीएलमध्ये शिरकाव केल्यानं बीसीसीआयसमोर अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

टॅग्स :आयपीएल २०२१कोलकाता नाईट रायडर्सकोरोना वायरस बातम्याबीसीसीआय