Join us  

IPL 2021 Auction : आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू कोण? ही आहे यादी...

By मोरेश्वर येरम | Published: February 17, 2021 1:57 PM

Open in App
1 / 9

IPL मध्ये धावा आणि विकेट्ससोबत पैशांचाही पाऊस पडतो याची कल्पना आपल्याला आहेच. BCCI च्या या श्रीमंत क्रिकेट लीगमुळे अनेक खेळाडूंचं नशीब फळफळतं. चला नजर टाकूयात ८ संघांतील अशा ८ खेळाडूंवर ज्यांना आयपीएलमध्ये सर्वाधिक मानधन मिळतं

2 / 9

आयपीएलमध्ये सर्वाधिक मानधन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीला मिळतं. विराट कोहलीला IPL 2021 साठी तब्बल १७ कोटी रुपये मानधन मिळणार आहे. तर आयपीएलमधून एकूण कमाई १४३.२ कोटी रुपये इतकी आहे. यंदाच्या आयपीएलसाठीही बंगळुरूच्या संघानं विराटला रिटेन केलं आहे. विराट कोहलीने IPL 2020 मध्ये १५ सामन्यांत ४६६ धावा केल्या होत्या.

3 / 9

चेन्नई सुपरकिंग्ज (CSK)- एम.एस.धोनी. IPL 2021 साठीचं मानधन- १५ कोटी रुपये. IPL मधून एकूण कमाई- १५२.८ कोटी रुपये. CSK नं धोनीला यंदाही रिटेन केलं आहे. धोनीनं IPL 2020 मध्ये १४ सामन्यांत केवळ २०० धावा केल्या होत्या.

4 / 9

मुंबई इंडियन्स (MI)- रोहित शर्मा. IPL 2021 साठीचं मानधन- १५ कोटी रुपये. IPL मधून एकूण कमाई- १४६.६ कोटी रुपये. MI ने २०२१ साठी IPL 2021 साठी रोहितला रिटेन केलं आहे.

5 / 9

कोलकाता नाइट रायडर्स (KKR)- पॅट कमिन्स. IPL 2021 साठीचं मानधन- १५.५ कोटी रुपये. IPL मधून एकूण कमाई- ३.७५ कोटी रुपये. KKR ने IPL 2021 साठी पॅट कमिन्सला रिटेन केलं आहे. पॅट किमन्सने गेल्या मोसमात १४ सामन्यांत १४६ धावा आणि १२ विकेट्स घेतल्या होत्या.

6 / 9

सनरायझर्स हैदराबाद (SRH)- डेव्हीड वॉर्नर. IPL 2021 साठीचं मानधन- १२.५ कोटी रुपये. वॉर्नरने IPL 2020 मध्ये १६ सामन्यांमध्ये ५४८ धावा केल्या होत्या.

7 / 9

राजस्थान रॉयल्स (RR)- बेन स्टोक्स. IPL 2021 साठीचं मानधन- १२.५ कोटी रुपये. IPL 2020 मध्ये ८ सामन्यांमध्ये स्टोक्सने २ विकेट्स आणि २८५ धावा केल्या होत्या.

8 / 9

किंग्ज इलेव्हन पंजाब (KXIP)- केएल राहुल. IPL 2021 साठीचं मानधन- ११ कोटी रुपये. लोकेश राहुल याला पंजाबच्या संघानं रिटेन केलं आहे. केएल राहुल यानं गेल्या मोसमात १४ सामन्यांत ६७० धावा केल्या होत्या.

9 / 9

दिल्ली कॅपिटल्स (DC)- रिषभ पंत. IPL 2021 साठीचं मानधन ८ कोटी रुपये. IPL च्या मागील मोसमात रिषभने १४ सामन्यांत ३४३ धावा केल्या होत्या.

टॅग्स :आयपीएल २०२१ मिनी ऑक्शनआयपीएलविराट कोहलीमहेंद्रसिंग धोनीबेन स्टोक्सलोकेश राहुल