Join us  

IPL 2020 : आजीचा आशीर्वाद; कल्याणच्या पोरासमोर जगातील स्फोटक फलंदाजानेही मानली हार!

By स्वदेश घाणेकर | Published: October 15, 2020 7:45 AM

Open in App
1 / 6

Indian Premier League ( IPL 2020) मध्ये बुधवारी दिल्ली कॅपिटल्सनं ( Delhi Capitals) १३ धावांनी राजस्थान रॉयल्सला ( Rajasthan Royals) हार मानण्यास भाग पाडले. DCच्या ७ बाद १६१ धावांचा पाठलाग करताना RRला ८ बाद १४८ धावा करता आल्या.

2 / 6

या सामन्यात पदार्पण करणाऱ्या DCच्या तुषार देशपांडेनं ( Tushar Deshpande) सर्वांचे लक्ष वेधले. त्यात १९३४ किलोमीटर दूर मुंबईत असलेल्या त्याच्या आजीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

3 / 6

कल्याणचा रहिवासी असलेल्या तुषारनं सुरवातीपासून फलंदाज होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. २००७ मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या १३ वर्षांखालील मुलांच्या संघाची निवड शिवाजी पार्क मैदानावर होणार होती. त्यावेळी फलंदाजांच्या ट्रायलसाठी लांबचलांब रांग पाहून तुषार गोलंदाजांच्या रांगेत जाऊन उभा राहिला. तेथे फार कमी खेळाडू होते. त्या दिवशी तुषारनं आश्वासक मारा करत निवड समितीच्या सदस्यांचं लक्ष वेधलं.

4 / 6

तुषारने २०१६-१७ साली मुंबईकडून रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण केलं. २०१८-१९ च्या विजय हजारे करंडक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत तुषारने ५ विकेट्स घेत मुंबईला एकहाती विजय मिळवून दिला. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरची विकेट घेत तो चर्चेत आला होता.

5 / 6

आयपीएलच्या १३व्या पर्वासाठी दिल्लीने त्याच्यावर २० लाखांची बोली लावली. तुषारनं दिल्लीकडून पदार्पण करताना बेन स्टोक्स व श्रेयस गोपाळ यांची विकेट घेतली.

6 / 6

तुषारनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २२४ धावांसह ५० विकेट्स घेतल्या आहेत. लिस्ट ए व ट्वेंटी -२०त त्याच्या नावावर अनुक्रमे २१ व ३३ विकेट्स आहेत.

टॅग्स :IPL 2020दिल्ली कॅपिटल्सराजस्थान रॉयल्स