Join us  

सुंदरा मनामध्ये भरली!; KKRच्या विजयानंतर 'तिच्या' फोटोनं सोशल मीडियावर माजवली खळबळ

By स्वदेश घाणेकर | Published: October 01, 2020 7:45 AM

Open in App
1 / 12

Indian Premier League ( IPL 2020) आज कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यातल्या सामन्यात KKRने बाजी मारली. शुबमन गिल ( Shubman Gill), इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) यांच्या दमदार कामगिरीनंतर KKRच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना RRचा विजयरथ अडवला.

2 / 12

शिवम मावी ( Shivam Mavi), वरुण चक्रवर्थी ( Varun Chakravarthi) आणि कमलेश नागरकोटी ( Kamlesh Nagarkoti) या युवा गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. नागरकोटीनं दोन विकेट्ससह दोन झेलही टिपले. दोन महत्त्वाचे फलंदाज बाद करणाऱ्या शिवम मावीला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कारानं गौरविण्यात आलं.

3 / 12

जोफ्रा आर्चरनं ( Jofra Archer) टिच्चून मारा करताना KKRच्या धावगतीला वेसण घातलं होतं. मात्र, शुबमन गिल ( Shubman Gill) आणि इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) यांनी फटकेबाजी करून KKR संघाला 6 बाद 174 धावांपर्यंत मजल मारून दिली. शुबमननं 34 चेंडूंत 47 धावा केल्या. नितिश राणाने 17 चेंडूंत 22 धावा केल्या. मॉर्गननं 23 चेंडूंत नाबाद 34 धावा केल्या.

4 / 12

लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला ( RR) 30 धावांत दोन धक्के बसले. कर्णधार स्टीव्ह स्मिथ ( 3) आणि संजू सॅमसन ( 8) यांना अनुक्रमे पॅट कमिन्स व शिवम मावी यांनी माघारी पाठवले. जोस बटलर आज फॉर्मात वाटत होता. त्यानं दोन खणखणीत षटकारही खेचले, परंतु सातव्या षटकात शिवम मावीनं त्याला चतुराईनं बाद केलं.

5 / 12

रॉबीन उथप्पाला मोठी खेळी करण्याची संधी होती. पण, तो 2 धावांवर माघारी परतला. RRने 9 बाद 137 धावा केल्या. KKRनं 37 धावांनी विजय मिळवला. टॉम कुरन 36 चेंडूंत 2 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 54 धावा केल्या.

6 / 12

KKR च्या विजयानंतर एका तरुणीनं संघाच्या जर्सीतील एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि ती कोण आहे, हे जाणून घेण्याची चढाओढ सुरू झाली.

7 / 12

संजना गणेसन असे या तरुणीचं नाव असून ती मॉडल आणि अँकर आहे. ती स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरींग केले आहे.

8 / 12

तिनं 2019च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केलं होतं.

9 / 12

पुणे येथील तिचा जन्म आहे. सिम्बॉससिस इंस्टीट्युटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यात तिने गोल्ड मेडलही पटकावलं आहे. त्यानंतर 2013-14मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरींग केलं.

10 / 12

11 / 12

12 / 12

टॅग्स :IPL 2020कोलकाता नाईट रायडर्सराजस्थान रॉयल्स