Join us  

IPL 2020: आता चेन्नईमध्ये पुन्हा होणार धोनी नामाचा गजर, पण का...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 8:43 PM

Open in App
1 / 11

धोनीला जर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरागमन करायचे असेल, तर त्याला एक गोष्ट निश्चितच करावी लागेल. धोनीला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये दमदार कामगिरी करावी लागेल.

2 / 11

आयपीएलमध्ये धोनीनं चांगली कामगिरी केल्यास त्याचा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. धोनीला सेंट्रल करार न देऊन बीसीसीआयनं जेवढे सामने खेळाल, तेवढंच मानधन मिळेल असे संकेत दिले आहेत.

3 / 11

करारामधून वगळले म्हणजे धोनी भारताकडून खेळू शकत नाही, असा याचा अर्थ होत नाही.

4 / 11

बीसीसीआयने जाहीर केलेला करार हा सप्टेंबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी आहे. धोनी सप्टेंबर २०१९ पासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पण धोनी आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळू शकतो.

5 / 11

हा विश्वचषक ऑक्टोबर महिन्यात खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे त्यावेळी बीसीसीआयचे नवीन करार करावा लागणार आहे. त्यामुळे धोनी हा आगामी करारामध्ये आपल्याला दिसू शकतो.

6 / 11

धोनीला पर्याय म्हणून रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आले होते. पंतला बऱ्याच संधी देण्यात आल्या. पण या संधीचा फायदा पंतला घेता आला नाही. त्यामुळे पंत सध्या संघाच्या बाहेर आहे.

7 / 11

सध्याच्या घडीला भारताच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी लोकेश राहुलवर सोपवण्यात आली होती.

8 / 11

धोनीने आता आयपीएलवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे धोनीने आयपीएलच्या सरावाची तारीखही ठरवली आहे.

9 / 11

धोनी २ मार्चला आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघाच्या सरावासाठी मैदानात उतरणार आहे.

10 / 11

धोनी चेन्नई सुपर किंग्स संघाचे होम ग्राऊंड असलेल्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर २ मार्चपासून सरावाला सुरुवात करणार आहे.

11 / 11

धोनी सप्टेंबर २०१९ पासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पण धोनी आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळू शकतो. फक्त त्यासाठी त्याला यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करावी लागेल.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीआयपीएलचेन्नई सुपर किंग्स