IPL 2020 : RCBच्या डग आऊटमध्ये दिसली 'मिस्ट्री गर्ल'; विराट अन् टीमसह केला विजयाचा जल्लोष

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) आणि मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) यांच्यातील सामना चुरशीचा होईल, याची सर्वांना अपेक्षा होती. पण, तो सुपर ओव्हरमध्ये जाईल, असा विचार कुणी केलाच नसावा..

प्रथम फलंदाजीला आलेल्या RCBनं आरोन फिंच ( Aaron Finch), देवदत्त पडीक्कल ( Devdutt Padikkal) आणि एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) यांच्या अनुक्रमे 52, 54 आणि 55 धावांच्या जोरावर 3 बाद 201 धावांचा डोंगर उभा केला.

मुंबई इंडियन्सला सुरुवातीला बसलेल्या धक्क्यानंतर RCBचा विजय पक्का मानला जात होता. MIला अखेरच्या पाच षटकांत म्हणजेच 30 चेंडूत 90 धावा हव्या होत्या.

यंदाच्या आयपीएलमध्ये पहिलाच सामना खेळणाऱ्या इशान किशन ( Ishan Kishan) आणि किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) यांनी सामना खेचून आणला. इशान 58 चेंडूंत 2 चौकार व 9 षटकार खेचून 99 धावांवर माघारी परतला अन् सामन्यात पुन्हा चुरस निर्माण झाली.

पोलार्डला अखेरच्या चेंडूवर 5 एवजी चारच धावा करता आल्यानं MI ला 5 बाद 201 धावांवर समाधान मानावे लागले. पोलार्डनं 24 चेंडूंत 3 चौकार व 5 षटकार खेचून नाबाद 60 धावा केल्या. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

RCBच्या नवदीप सैनीनं ( Navdeep Saini) टिच्चून मारा करताना MIला 7 धावांवर रोखले आणि विराट कोहली व एबी यांनी हे लक्ष्य पार करून RCBला विजय मिळवून दिला.

या विजयानंतर RCBच्या डग आऊटमध्ये एक मिस्ट्री गर्ल दिसली. कोण आहे ती?

नवनिता गौतम असे या मुलीचे नाव आहे आणि RCBच्या सपोर्ट स्टाफची ती सदस्य आहे.

नवनिताचे RCBसोबत काम करण्याचे पहिलेच वर्ष असून गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात RCBने तिच्यासोबत करार केला.

नवनितानं यापूर्वी क्रिकेटपटू आणि इतर खेळाडूंबरोबर काम केलेलं आहे.

मूळची कॅनडाची असणाऱ्या नवनिताने यापूर्वी ग्लोबल ट्वेंटी-20 कॅनडा लीगमधील टोरांटो नॅशनल्स या संघासाठी काम केलं आहे. त्याशिवाय बास्केटबॉल आशिया कपमध्ये तिने भारतीय महिला संघासोबत काम केलं आहे.