Join us  

IPL 2019: विराट कोहलीनं रचला इतिहास, पाडला विक्रमांचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 5:07 PM

Open in App
1 / 7

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला गुरुवारी मुंबई इंडियन्सकडून 6 धावांनी पराभव पत्करावा लागला. पण, या सामन्यात बंगळुरूच्या कर्णधार विराट कोहली याने विक्रमांची रांग लावली.

2 / 7

विजयासाठीच्या 188 धावांचा पाठलाग करताना कोहलीने 32 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीने 46 धावा केल्या.

3 / 7

या खेळीत त्याने आयपीएलमध्ये 5000 धावांचा पल्ला पार केला आणि सुरेश रैनानंतर अशी कामगिरी करणार तो दुसरा फलंदाज ठरला.

4 / 7

रैनाने याच सत्रात 23 मार्चला बंगळुरूविरुद्ध 5000 धावा करणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा मान मिळवला होता.

5 / 7

परंतु, कोहलीनं 165 सामन्यांत 5000 धावा चोपल्या आणि आयपीएलमध्ये सर्वात जलद 5000 धावांचा विक्रम नावावर केला.

6 / 7

विशेष म्हणजे कोहलीनं या 5000 धावा एकाच संघाकडून म्हणजेच बंगळुरूकडून केल्या आहेत आणि अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज आहे.

7 / 7

कोहलीने या खेळीसह मुंबई इंडियन्सविरुद्ध 600 धावाही पूर्ण केल्या अशी कामगिरी करणारा तो चौथा फलंदाज ठरला.

टॅग्स :विराट कोहलीआयपीएल 2019रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर