भारतीय संघात 'भाकरी' फिरणार; वेस्ट इंडिज दौऱ्यात ५ मोठे बदल दिसणार, ३ युवा खेळाडूंना संधी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर टीम इंडियासा आचा पुढच्या WTC 2023-25 पर्वात पहिल्याच मालिकेत वेस्ट इंडिजचा सामना करायचा आहे.

भारतीय संघ पुढील महिन्यात विंडीज दौऱ्यावर जाणार आहे आणि तिथे २ कसोटी, ३ वन डे आणि ५ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. WTC Final मधील पराभवानंतर विंडीज दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात ५ मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियामध्ये ५ मोठे बदल पाहायला मिळू शकतात. पण, रोहित शर्माच कसोटी संघाचा कर्णधार असणार आहे. भारतीय कसोटी संघाच्या प्लेइंग-इलेव्हनचा भाग असलेल्या चेतेश्वर पुजाराला डच्चू मिळण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे यांचे स्थान पक्के आहे.

पुजाराच्या जागी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये राखीव खेळाडू म्हणून निवड झालेल्या यशस्वी जैस्वालला संधी मिळू शकते. पुजारा गेल्या अडीच वर्षांपासून खराब फॉर्मशी झुंजत आहे.

मोहम्मद शमीला विश्रांती दिली जाऊ शकते . शमी अनेक महिन्यांपासून सतत क्रिकेट खेळत आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्येही तो टीम इंडियाचा भाग होता. आयपीएल २०२३ मध्ये त्याने १७ सामने खेळले. त्याला कसोटी मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते. वन डे वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवता तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात परत येऊ शकतो.

उम्रान मलिक-अर्शदीप सिंग यांची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड होऊ शकते. या दोन्ही गोलंदाजांची वन डे, ट्वेंटी-२० संघांत निवड होऊ शकते. संजू सॅमसनचे वन डे आणि ट्वेंटी-२० संघात पुनरागमन होऊ शकते.

डब्ल्यूटीसी फायनलमध्ये केएस भरत फलंदाजीत फ्लॉप झाला असला तरी वेस्ट इंडिज दौऱ्यावर होणाऱ्या २ कसोटी सामन्यांसाठी तो संघातील स्थान वाचवू शकेल.