Join us  

भारताचे युवा खेळाडू स्वत:ला सिद्ध करण्यास सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2018 11:04 PM

Open in App
1 / 5

कोलंबो : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताचा युवा संघ मंगळवारी तिरंगी निधास टी-२० कप स्पर्धेच्या सलामी लढतीत श्रीलंकेच्या आव्हानाला सामोरे जाणार आहे.

2 / 5

पुढील वर्षी होणा-या विश्वकप स्पर्धेत निवड समितीचे लक्ष वेधण्याची युवा खेळाडूंना संधी आहे. यंदाच्या मोसमात भारताने श्रीलंकेविरुद्ध मायदेशात व श्रीलंकेत १८ आंतरराष्ट्रीय (६ कसोटी, ८ वन-डे आणि ४ टी-२०) सामने खेळले आहेत.

3 / 5

बांगलादेश या मालिकेत सहभागी झालेला तिसरा संघ आहे. भारताने या मालिकेसाठी आघाडीच्या सहा खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यामुळे युवा खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे.

4 / 5

रिषभ पंत, दीपक हुड्डा व मोहम्मद सिराज यांचा संघात समावेश आहे. आयसीसी विश्वकप स्पर्धेला केवळ १६ महिन्यांचा कालावधी शिल्लक असून प्रत्येक खेळाडू निवड समितीचे लक्ष वेधण्यास प्रयत्नशील आहे.

5 / 5

भारतीय संघाने जास्तीतजास्त वेळा श्रीलंका संघाला पराभूत केले आहे. कार्यवाहक कर्णधार रोहित शर्माकडे जेतेपद पटकावण्याची चांगली संधी आहे. दक्षिण आफ्रिका दौ-यात निराशाजनक कामगिरीनंतर रोहित शर्माला सूर गवसण्याची आशा आहे.

टॅग्स :क्रिकेट