नॅशनल क्रश बनलेल्या Smriti Mandhana नं केलं मॅगझीनसाठी फोटोशूट, पाहा तिचा ग्लॅमरस लूक

महिला क्रिकेट टीमची दिग्गज खेळाडू स्मृती मानधनानं नुकतंच एक ग्लॅमरस फोटोशूट केलं. तिनं आपल्या कपड्यांसोबत एक एक्सपरिमेंटही केलं, त्यात एक खास संदेशही आहे.

स्मृती मंधानाच्या फोटोशूटमध्ये ती सर्व पोशाख अतिशय उत्तम प्रकारे कॅरी करताना दिसतेय. या चित्रात तुम्ही पाहू शकता की ती निळ्या रंगाच्या ऑफ-शोल्डर गाउनसह पांढरा टी-शर्ट परिधान करताना दिसत आहे. हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो.

तिने पांढऱ्या शर्टसोबत स्लीव्हलेस ब्लू शॉर्ट ड्रेस मॅच केलाय आणि पांढरे मोजे घातले आहेत. केसांना मेकअपशिवाय साध्या पोनीटेलमध्ये स्टाईल केले आहे. स्त्रिया ज्याप्रकारे सर्व प्रकारचे आऊटफिट्स कॅरी करतात, त्याचप्रमाणे त्या प्रत्येक क्षेत्रात आपला झेंडा फडकावू शकतात, असे तिचे हे फोटोशूट सांगत आहे.

या लूकमध्ये ती मिड-लेन्थ ब्लॅक प्लीटेड स्कर्ट, पिंक आणि ब्लॅक शर्ट आणि क्रॉप ब्लेझरमध्ये दिसत आहे. महिला आणि पुरुष क्रिकेटमधील तुलना मला आवडत नाही, असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते. तिच्या या फोटोशूटमध्येही असेच काहीसे दिसून येत आहे, ज्यामध्ये तिने दोघांचेही एकत्र प्रतिनिधित्व करणारे कपडे परिधान केले आहेत.

स्मितीने तिच्या प्रत्येक लूकला वेगळा टच देण्याचा प्रयत्न केलाय. या फोटोमध्ये, ती पांढरा शर्ट आणि टाय असलेल्या स्ट्रॅपलेस गाऊनमध्ये दिसत आहे. अधिकाधिक महिलांनी खेळात रस दाखवावा अशी तिची इच्छा असल्याचे म्हटले आहे.

सध्या विंटर सीझन आला आहे आणि अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या पांढऱ्या शर्टसोबत राऊंड नेकलाइनचे मल्टीकलर स्वेटर नक्कीच ट्राय करू शकता. जशी स्मृती मानधना या फोटोत दिसत आहे.

स्मृतीला इंडियन आऊटफिट्सचीही खूप आवड आहे. या फोटोमध्ये तिने गुलाबी नक्षी असलेला लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे आणि कमीतकमी मेकअप आणि दागिन्यांसह ती सुंदरही दिसत आहे.

इंडियन आऊटफिट्सप्रमाणे स्मृतीला कॅज्युअल कपड्यांचीही मोठी आवड आहे. नेव्ही ब्ल्यू रंगाच्या हुडीसोबत रिप्ड ब्ल्यू जीन्समध्ये तिचा लूक स्मार्ट दिसत आहे.

ब्राऊन कलरच्या जंपसूटमध्ये स्मृती आपल्या वडिलांसोबत दिसत आहे. तिचं आणि तिच्या वडिलांचं स्ट्राँग बॉंडिंगही आहे.