Join us  

सातवीतील ओळख ते आयुष्याचा जोडीदार! अश्विनच्या पत्नीचा खुलासा; सांगितली 'प्यारवाली लव्हस्टोरी'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2023 4:51 PM

Open in App
1 / 9

भारतीय संघाचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन आपल्या फिरकीच्या जोरावर भल्याभल्यांना नाचवण्यासाठी माहिर आहे. तो सध्या आयपीएल २०२३ मध्ये व्यस्त असून राजस्थान रॉयल्सच्या संघाचा हिस्सा आहे.

2 / 9

अश्विनने यंदाच्या आयपीएल हंगामात आतापर्यंत ९ सामन्यांमध्ये १३ बळी घेतले आहेत. पर्पल कॅप जिंकणाऱ्यांच्या शर्यतीत असणाऱ्या अश्विनची प्रेमकहाणी फारच गमतीशीर आहे. ३६ वर्षीय क्रिकेटपटूच्या पत्नीचे नाव प्रीती नारायण आहे.

3 / 9

प्रीती अश्विनचे इंस्टाग्राम अकाउंट अनेक ग्लॅमरस फोटोंनी भरलेले आहे. ती नेहमी अश्विन आणि आपल्या मुलींसोबतचे फोटो शेअर करत असते. प्रीती नारायणनने नुकतीच JioCinema वरील Match Center Live च्या 'Hangouts' शोमध्ये हजेरी लावली.

4 / 9

यादरम्यान होस्ट सानिया मिर्झा, वेदा कृष्णमूर्ती आणि दानिश सैत यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान रविचंद्रन अश्विनसोबतच्या तिच्या नातेसंबंधाबद्दल तिने भाष्य केले आहे. याशिवाय अश्विनच्या पत्नीने फिरकीपटूच्या प्रेमसंबंधाबद्दल काही खुलासे केले आहेत.

5 / 9

प्रीतीने जिओ सिनेमावर बोलताना म्हटले, 'आम्ही एकाच शाळेत शिकलो आहे आणि अशा प्रकारे आमची ओळख झाली. पण नंतर आम्ही मोठे झाल्यानंतर पुन्हा भेटलो. मी एका इव्हेंट कंपनीत काम करायचे. पण त्याला मी आधीपासूनच खूप आवडायचे आणि संपूर्ण शाळेला ही बाब माहिती होती.'

6 / 9

'क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी तो गेला पण आम्ही वाढदिवस अशा गोष्टींद्वारे एकमेकांच्या संपर्कात राहिलो. जेव्हा मी चेन्नई सुपर किंग्जचे अकाउंट हाताळत होते, तेव्हा माझी पुन्हा एकदा त्याच्यासोबत भेट झाली. आम्ही इयत्ता सातवीपासून एकमेकांना ओळखत आहे', असे अश्विनच्या पत्नीने सांगितले.

7 / 9

आर अश्विनसोबतच्या प्रपोजबद्दल बोलताना त्याच्या पत्नीने सांगितले, 'त्याने मला एकदा क्रिकेटच्या मैदानावर नेले होते. तेव्हा त्याने म्हटले, माझ्या आयुष्यात मी फक्त तुलाच पसंत केले आहे आणि १० वर्षांत ते बदलले नाही. आता आपण तरूण आहे, चल मग हे स्वीकारू.'

8 / 9

तसेच प्रीतीने याचा देखील खुलासा केला की, दोघांमधील वादाचे प्रमुख कारण नेहमी आर अश्विन असतो (मिश्किलपणे).

9 / 9

टॅग्स :आर अश्विनदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टऑफ द फिल्डआयपीएल २०२३राजस्थान रॉयल्स
Open in App