वडिलांनी मारण्याचा प्रयत्न केला, पण आईने जवळ केले, त्यानंतर... स्टार क्रिकेटपटूची भावूक कहाणी

India vs West Indies 1st T20, Rovman Powell: भारत आणि वेस्ट इंडिजच्या संघामध्ये पाच टी-२० सामन्यांची मालिका आजपासून खेळवली जाणार आहे. पोर्ट ऑफ स्पेन येथे होणारा पहिला सामना भारतीय वेळेनुसार ८ वाजता खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी भारताने कसोटी मालिका १-० आणि एकदिवसीय मालिकेत २-१ ने मात दिली होती.

भारत आणि वेस्ट इंडिजच्या संघामध्ये पाच टी-२० सामन्यांची मालिका आजपासून खेळवली जाणार आहे. पोर्ट ऑफ स्पेन येथे होणारा पहिला सामना भारतीय वेळेनुसार ८ वाजता खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी भारताने कसोटी मालिका १-० आणि एकदिवसीय मालिकेत २-१ ने मात दिली होती.

आता हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या संघाचा टी-२० मालिकेमध्ये सामना करणार आहे. दुसरीकडे भारतीय संघाचं नेतृत्व ३० वर्षांच्या रोवमन पॉवेलच्या हातात असेल. त्याने आतापर्यंत ३ एकदिवसीय आणि ४ टी-२० सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजच्या संघाचं नेतृत्व केलं आहे.

रोवमन पॉवेलचं जीवन खूप संघर्षमय राहिलेलं आहे. त्याचा गरिबीतून बाहेर पडत वेस्ट इंडिजचा कर्णधार बनण्यापर्यंतचा प्रवास खूप खडतर होता. जमैकामध्ये जन्मलेला हा स्टार खेळाडू आज आलिशान जीवन जगत असला तरी त्याचं बालपण खूप संघर्षमय राहिलेलं आहे. त्याच्या संघर्षाची कहाणी खूप भावूक करणारी आहे.

रोवमन पॉवेलचा सांभाळ आणि पालनपोषण त्याची बहीण ाणि आईने केलं. जेव्हा तो गर्भात होता तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याच्या आईचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आई ऐकली नाही. तिने या मुलाचा स्वीकार केला. आज तोच मुलगा आईचं आणि त्याच्या देशाचं नाव जागतिक पाळीवर उंचावत आहे.

रोवमन आणि त्याच्या बहिणीच्या शिक्षणासाठी त्यांच्या आईने लोकांच्या घरी धुणीभांडी केली. रोवमनचा जन्म वेस्ट इंडिजमधील जमैका येथील बेनिस्टोर डिस्ट्रिक्ट ऑफ ओल्ड हार्बर येथे झाला होता. त्याच्या कुटुंबात त्याची आई आणि धाकटी बहीण आहे.

वेस्ट इंडिजचे एक महान गोलंदाज इयान बिशप यांनी सांगितले की, रोवमनने शाळेत शिकत असताना मी तुला गरिबीतून बाहेर काढीन, असं वचन आईला दिलं होतं. तो तेच वचन पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत आहेत. २०१९ मध्ये रोवमनने २०१९ मध्ये आईला एक कार भेट दिली होती.

तर रोवममच्या आईने एका मुलाखतीत सांगितलं की, माझा मुलगा खूप खट्याळ आहे. मात्र तो तितकाच समजूतदार आहे. तर पॉवेल म्हणाला होता की, जेव्हा मी अडचणींचा सामना करत असतो, तेव्हा मी स्वत:ला असं समजावतो की, हे मी माझ्यासाठी नाही तर माई आई आणि बहिणीसाठी करत आहे. त्यांच्यावर मी खूप प्रेम करतो. रोमवन त्याच्या आईलाच आपले वडील मानतो.

वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटपटू रोवमन पॉवेलच्या पत्नीचं नाव प्रिया अलेक्झँडर आहे. त्यांनी बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २ मार्च २०१९ रोजी विवाह केला होता. रोवमन सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असून, तो कुटुंबासह फोटो व्हिडीओ शेअर करत असतो.