गुवाहाटीत KL Rahulसोबत दिसली 'सुंदर' बाला; तिच्या फोटोंची सोशल मीडियावर हवा!

भारत-श्रीलंका यांच्यातल्या वन डे मालिकेत यजमान टीम इंडियाने दोन्ही सामने जिंकताना विजयी आघाडी घेतली आहे.

भारत-श्रीलंका यांच्यातल्या वन डे मालिकेत यजमान टीम इंडियाने दोन्ही सामने जिंकताना विजयी आघाडी घेतली आहे. गुरुवारी कोलकाता येथे झालेल्या दुसऱ्या वन डे सामन्यात लोकेश राहुल ( KL Rahul), कुलदीप यादव व मोहम्मद सिराज हे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

कुलदीप यादव व मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी ३, तर उम्रान मलिकने २ विकेट घेत श्रीलंकेचा संघ २१५ धावांवर गुंडाळला. त्यानंतर लोकेश राहुलने संयमी नाबाद ६४ धावांची खेळी करून भारताला ४ विकेट्सने विजय मिळवून दिला.

भारत-श्रीलंका मालिकेतील पहिला वन डे सामना गुवाहाटी येथे खेळला गेला अन् त्या सामन्यात रोहित शर्मा व शुभमन गिल यांच्या अर्धशतकानंतर विराट कोहलीने शतकी खेळी केली. त्यातही भारताने दणदणीत विजय मिळवला. या सामन्यादरम्यान लोकेश राहुलचा एका सुंदरीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या मालिकेनंतर लोकेश राहुल विश्रांती घेणार आहे. २३ जानेवारीला लोकेश राहुल अन् अभिनेत्री अथिया शेट्टी यांचा विवाह होणार आहे.

गुवाहाटी येथे लोकेश राहुलच्या ज्या मुलीसोबत फोटो व्हायरल झाला तिचं नाव प्रियाम पालाबी ( Priyam Pallabee) असे सांगण्यात येत आहे.

प्रियाम ही आसामी अभिनेत्री आहे आणि इंस्टाग्रामवर तिचे ४.७० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

आसामी म्युझिक व्हिडीओ, मालिका यांमध्ये तिने काम केले आहेत. इंस्टाग्रामवर तिचे अनेक डान्सिंग व्हिडीओ आहेत.

गायक विग्रू कश्यप हिच्यासोबत ती नात्यात आहे. गुवाहाटी येथील गोलपारा येथील तिचा जन्म आहे.