Rohit Sharma, Ishan Kishan, Top 5, India vs Sri Lanka 1st T20 : रोहित, इशान किशन अन् Shreyas Iyerची बॅट तळपली; 'हे' ठरले टीम इंडियाच्या विजयाचे ५ हिरो!

भारताने श्रीलंकेचा ६२ धावांनी केला सहज पराभव

Top 5 Heroes, India vs Sri Lanka 1st T20 : भारतीय संघाने पहिल्या टी२० सामन्यात श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला. रोहितने पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वकौशल्याच्या जोरावर भारताला ६२ धावांनी मोठा विजय मिळवून दिला. या सामन्यात साऱ्यांनीच दमदार कामगिरी केली. पण त्यातही विजयाचे खरे हिरो ठरले हे Top 5 खेळाडू-

Ishan Kishan - इशान किशनने धडाकेबाज खेळी करत ५६ चेंडूत ८९ धावा केल्या. इशानच्या खेळीत १० चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. महत्त्वाची बाब म्हणजे, टी२० क्रिकेटमध्ये भारतीय किपरने केलेल्या या सर्वाधिक वैयक्तिक धावा ठरल्या.

Shreyas Iyer - भारताचा दमदार फलंदाज श्रेयस अय्यर याने संथ सुरूवात केली पण नंतर तुफान फटकेबाजीच्या जोरावर २८ चेंडूत नाबाद ५७ धावा केल्या. त्याच्या खेळीत ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.

Rohit Sharma - भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने पहिल्या टी२० सामन्यात २ चौकार आणि एका षटकारासह ३२ चेंडूत ४४ धावा कुटल्या. त्याचं अर्धशतक हुकलं, पण पुरूष टी२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावे झाला. ३ हजार ३०० धावांचा टप्पा ओलांडणारा तो पहिला फलंदाज ठरला.

Bhuvneshwar Kumar - भुवनेश्वर कुमारला अखेर श्रीलंका विरूद्धच्या मालिकेत सूर गवसला. आफ्रिका आणि वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेत त्याला बराच मार पडला. पण पहिल्या टी२०मध्ये मात्र त्याने अतिशय सुंदर गोलंदाजी केली. त्याने ९ धावा देत २ बळी टिपले.

Venkatesh Iyer - वेंकटेश अय्यर याने भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. दीपक चहरच्या अनुपस्थितीत योग्य वेळी गोलंदाजी करत त्याने संघाला विजयाच्या नजीक नेलं. त्याच्या ३ षटकात ३६ धावा ठोकण्यात आल्या पण त्याने मोक्याच्या क्षणी २ गडी बाद करत संघाला विजय मिळवून दिला.