Join us  

...तर India vs Pakistan उपांत्य फेरीत भिडणार! आफ्रिकेच्या विजयाने गणितात गडबड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 9:30 PM

Open in App
1 / 7

India vs Pakistan Semi in Kolkata? दक्षिण आफ्रिकेने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत बुधवारी न्यूझीलंडवर १९० धावांनी विजय मिळवला. आफ्रिकेने या विजयासह भारताच्या १२ गुणांशी बरोबरी केली, परंतु त्यांचा नेट रन रेट हा २.२९०असा मजबूत असल्याने ते अव्वल स्थानावर सरकले आहेत.

2 / 7

भारतीय संघ १२ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आला. आफ्रिकेच्या आजच्या विजयाने पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या मार्गातील एक अडथळा दूर केला आणि त्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातल्या उपांत्य फेरीच्या शक्यतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

3 / 7

क्विंटन डी कॉक ( ११४) आणि रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( १३३) यांच्या २०० धावांच्या भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ३५७ धावांचा डोंगर उभा केला. डेव्हिड मिलरने ५३ धावांची खेळी करून त्यात हातभार लावला.

4 / 7

प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संपूर्ण संघ ३५.३ षटकांत १६७ धावांत तंबूत परतला आणि आफ्रिकेचा १९० धावांनी दणदणीत विजय पक्का झाला. या वर्ल्ड कप स्पर्धेतील हा तिसरा सर्वात मोठा ( धावांच्या बाबतीत) विजय ठरला. केशव महाराजने ४, मार्को यानसेनने ३, गेराल्ड कोएत्झीने २ आणि कागिसो रबाडाने १ विकेट घेतली. २४ वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेने वन डे वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडवर विजय मिळवला.

5 / 7

पाकिस्तानला उपांत्य फेरीसाठी उर्वरित २ सामन्यांत न्यूझीलंड व इंग्लंडचा सामना करायचा आहे आणि त्यांना हे दोन्ही सामने सर्वोत्तम नेट रन रेटने जिंकणे महत्त्वाचे आहेत. त्यात जर त्यांनी १ विजय मिळवल्यास न्यूझीलंड/ऑस्ट्रेलिया यांनी तिन्ही सामने हरणे गरजेचे होईल. त्याचवेळी अफगाणिस्तानने २/३ सामने गमावणे महत्वाचे.

6 / 7

न्यूझीलंड पुढील दोन सामन्यांत पाकिस्तान व श्रीलंकेचा सामना करणार आहे. त्यात जर न्यूजीलंडने दोन्ही सामने गमावले आणि पाकिस्तानने उर्वरित सामने जिंकले तर बाबर आजमचा संघाचे १० गुण होतील. न्यूझीलंड ८ गुणांसह शर्यतीतून बाद होईल. तसेही या पराभवामुळे न्यूझीलंडचा नेट रन रेटही १.२३ वरून ०.४८४ असा घसरला आहे.

7 / 7

त्याचाही पाकिस्तानला फायदा होऊ शकतो आणि ते चौथ्या क्रमांकासह उपांत्य फेरीत पोहचू शकतात. असे झाल्यास भारताने नंबर १ स्थानासह साखळी फेरी संपवल्यास उपांत्य फेरीच्या लढतीत IND vs PAK भिडू शकतात. मग ही मॅच कोलकाताच्या ईडन गार्डनवर होईल.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध पाकिस्तानद. आफ्रिकान्यूझीलंड