india vs england : ' हे ' गोलंदाज मिळवून देऊ शकतात भारताला विजय

इशांत शर्मा : भारतीय संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज म्हणजे इशांत शर्मा. आपल्या बाऊन्सरच्या जोरावर इशांतने भारताला इंग्लंडमध्ये विजय मिळवून दिला होता. पण यावेळी त्याच्याकडून तशीच कामगिरी होणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.

मोहम्मद शमी : भारताच्या संघातील सर्वात गुणवान वेगवान गोलंदाज, असे मोहम्मद शमीला म्हटले जाते. शमी दोन्ही स्विंग करू शकतो. त्याचबरोबर त्याचा रीव्हर्स स्विंगही भेदक असतो. त्यामुळे त्याच्याकडून संघाला मोठी अपेक्षा आहे.

उमेश यादव : भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज आहे तो उमेश यादव. आतापर्यंत त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर फलंदाजांना धारेवर धरले आहे. या मालिकेत तो कसा भेदक मारा करतो, हे पाहावे लागेल.

आर. अश्विन : भारतीय संघातील अनुभवी फिरकीपटू म्हणून अश्विनचे नाव घेतले जाते. यापूर्वी अश्विनने इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली आहे. बहुतेक त्याचा हा अखेरचा इंग्लंड दौरा असेल. त्यामुळे आपला हा अखेरचा दौरा अश्विन अविस्मरणीय करणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.