Join us  

India vs England 3rd Test Live : अम्पायरच्या चुकीचा टीम इंडियाला मोठा धक्का, बाद नसूनही रोहित शर्माला जावे लागेल माघारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 9:25 PM

Open in App
1 / 14

india vs England 2021 3rd test match live cricket score : लीड्स कसोटीतील टीम इंडियानं दुसऱ्या डावात चांगली सुरुवात केली. इंग्लंडनं पहिल्या डावात घेतलेल्या ३५४ धावांची आघाड्या आघाडीचा पाठलाग करताना रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा यांनी अर्धशतकी खेळी केली. चांगल्या फॉर्मात असलेल्या रोहितला अम्पायरनं एकदा जीवदान दिलं.

2 / 14

पायचीत असूनही त्याला मैदानावरील अम्पायरनं नाबाद दिलं अन् इंग्लंडचा कर्णधार जो रूट DRS घेण्यापासून हुकला. पण, अम्पायरनं दिलेल्या जीवदानाची सव्याज वसूली केली. ऑली रॉबिन्सनला अखेर रोहितची विकेट घेण्यात यश मिळालं, परंतु रोहित नाबाद होता अन् तरीही अम्पायरच्या चुकीमुळे त्याला माघारी जावं लागलं. ( Rohit Sharma is so unlucky, was looking so good but umpires call was against him )

3 / 14

भारताचा पहिला डाव ७८ धावांवर गडगल्यानतंर इंग्लंडचे सलामीवीर हसीब हमीद ( ६८) आणि रोरी बर्न्स ( ६१) यांनी १३५ धावांची भागीदारी करून चांगली सुरुवात करून दिली. कर्णधार जो रूटनं पुन्हा एकदा दमदार खेळ केला. त्यानं डेविड मलानसह ( ७०) १३९ धावांची भागीदारी केली. रूट १६५ चेंडूंत १४ चौकारांसह १२१ धावा करून माघारी परतला. त्यानंतर रवींद्र जडेजानं मोईन अलीची ( २९) विकेट घेतली. भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक चार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

4 / 14

दुसऱ्या डावात रोहित व लोकेशनं आश्वासक सुरुवात करत काही सुरेख फटके मारले. लोकेशला अम्पायरनं पायचीत बाद दिले होते, पंरतु त्यानं लगेच रिव्ह्यू घेतला आणि त्यामुळे तो वाचला. पण, त्याचा फायदा उचलण्यात तो अपयशी ठरला. लंच ब्रेक होण्यापूर्वीच्या षटकात लोकेश ८ धावांवर माघारी परतला.

5 / 14

रोहित व चेतश्वर पुजारा या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी १७३ चेंडूंत ८२ धावांची भागीदारी करून टीम इंडियाचा डाव सावरला. रोहित ३८ धावांवर असताना पायचीतची अपील झाली. गोलंदाज ठाम होता की रोहित बाद आहे, परंतु कर्णधार जो रूटला DRSसाठी तयार करण्यापर्यंत १५ सेकंदाचा वेळ पूर्ण झाला अन् इंग्लंडला DRS घेता आला नाही. त्यानंतर रिप्लेत रोहित बाद असल्याचे स्पष्ट दिसत होते. तेव्हा त्याला जीवदान मिळाले.

6 / 14

रोहितनं त्याचा फायदा घेत अर्धशतक पूर्ण केले. २०२१मधील त्याचे हे पाचवे अर्धशतक ठरले. ४८व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रोहितसाठी LBWची अपील झाली, मैदानावरील पंचांनी त्याला बाद दिले. पण, याविरोधात हिटमॅननं DRS घेतला. त्यात चेंडू यष्टिंना चुकवून जात असल्याचे दिसत होते. फक्त umpires call मुळे रोहितला बाद ठरवण्यात आले. रोहित १५६ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ५९ धावांवर माघारी परतला.

7 / 14

8 / 14

9 / 14

10 / 14

11 / 14

12 / 14

13 / 14

14 / 14

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्मा
Open in App