Join us  

India vs Australia : विराट कोहलीनं मोडला सचिन तेंडुलकरचा सर्वात भारी विक्रम, जगात ठरला अव्वल

By स्वदेश घाणेकर | Published: December 02, 2020 10:05 AM

Open in App
1 / 10

वन डे मालिकेत ०-२ अशा पिछाडीनंतर तिसऱ्या सामन्यात इभ्रत वाचवण्याचे आव्हान टीम इंडियासमोर आहे. तिसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल अखेर कर्णधार विराट कोहलीच्या ( Virat Kohli) बाजूने पडला आणि त्यानं त्वरीत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

2 / 10

मयांक अग्रवालला ( Mayank Agarawal) विश्रांती दिल्यानं शिखर धवनसह सलामीला शुबमन गिल आला. टीम इंडियानं आजच्या सामन्यात चार बदल केले. टी नटराजननं वन डे संघात पदार्पण केले, तर शार्दूल ठाकूर व कुलदीप यादव यांनीही अंतिम अकरामध्ये स्थान पटकावले. नवदीप सैनी, मोहम्मद शमी, मयांक आणि युजवेंद्र चहल यांना विश्रांती देण्यात आली आहे.

3 / 10

धवन व गिल जोडीला पहिल्या विकेटसाठी २६ धावाच करता आल्या. सीन अॅबोटनं सहाव्या षटकात धवनला ( १६) सहज बाद केले. कव्हरला उभ्या असलेल्या अॅश्टन अॅगरनं सोपा झेल टिपला. त्यानंतर आलेल्या विराटनं २३वी धाव घेताना विक्रमाला गवसणी घातली.

4 / 10

या सामन्यापूर्वी विराटच्या नावावर २५० सामन्यांत ११, ९७७ धावा होत्या. त्यानं या मालिकेतील पहिल्या दोन वन डे सामन्यात अनुक्रमे २१ व ८९ धावा केल्या होत्या.

5 / 10

वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १२००० धावांचा विक्रम विराटनं नावावर केला. त्यानं सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. विराटनं २५१ व्या वन डे सामन्यात १२ हजार धावा पूर्ण केल्या.

6 / 10

वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १२ हजार धावांचा विक्रम सचिनच्या नावावर होता. सचिननं ३०९ वन डेत ३०० डावांमध्ये हा पल्ला पार केला होता. कोहलीनं ५८ सामन्यांपूर्वी हा पल्ला पार केला.

7 / 10

वन डे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान १२ हजार धावा करणारे फलंदाज - विराट कोहली ( २५१ सामने व २४२ डाव), सचिन तेंडुलकर ( ३०९ सामने व ३०० डाव), रिकी पाँटिंग ( ३२३ सामने व ३१४ डाव ), कुमार संगकारा ( ३५९ सामने व ३३६ डाव), सनथ जयसूर्या ( ३९० सामने व ३७९ डाव), महेला जयवर्धने ( ४२६ सामने व ३९९ डाव)

8 / 10

9 / 10

10 / 10

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीसचिन तेंडुलकर