Join us  

India vs Australia : जखमी होण्यापूर्वी रिषभ पंतचा पराक्रम, मोडला व्हिव रिचर्ड्ससह दिग्गजांचा मोठा विक्रम

By बाळकृष्ण परब | Published: January 09, 2021 10:55 PM

Open in App
1 / 6

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत फलंदाजी करत असताना ऋषभ पंत जखमी झाल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. मात्र या सामन्यात पहिल्या डावात बाद होण्यापूर्वी रिषभ पंतने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

2 / 6

सिडनी कसोटीमधील पहिल्या डावात रिषभ पंत याने हा खास विक्रम केला. या कसोटीत तिसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत पंत २९ धावांवर नाबाद राहिला होता.

3 / 6

या दरम्यान, रिषभने ऑस्ट्रेलियामधील कसोटी क्रिटेटमधील आपल्या ४०० धावा पूर्ण केल्या. यादरम्यान, त्याची सरासरी ५० हून अधिक राहिली.

4 / 6

उल्लेखनीय बाब म्हणजे रिषभ पंतने ऑस्ट्रेलियात खेळलेल्या सलग ९ कसोटी डावांमध्ये त्याने २५ हून अधिक धावा केल्या. त्याबरोबरच अशी कामगिरी करणारा तो पाहुण्या संघाकडून खेळणारा पहिला खेळाडू ठरला. अखेरीच या डावात पंत ३५ धावांवर बाद झाला.

5 / 6

यापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये सलग आठ डावात २५ हून अधिक धावा काढण्याच्या विक्रम वॉली हॅमंड, रुसी सुरती आणि व्हिव रिचर्च यांच्या नावे होता.

6 / 6

२०१८ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतने आपली कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी सिडनीतीच याच मैदानावर केली होती. त्यावेळी त्याने १५९ धावा फटकावल्या होत्या.

टॅग्स :रिषभ पंतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघ