India Vs Australia: बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत अश्विनचे सर्वाधिक बळी, तर सर्वाधिक धावा..., असं आहे रेकॉर्डबुक

Border-Gavaskar Trophy 2023 : सोमवारी आटोपलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेमध्ये भारताने २-१ अशा फरकाने बाजी मारली. त्याबरोबरच भारताने सलग चौथ्यांदा ही मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. तर चौथा सामना फलंदाजांनी गाजवला. या मालिकेत झालेले रेकॉर्ड्स पुढीलप्रमाणे आहेत.

सोमवारी आटोपलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेमध्ये भारताने २-१ अशा फरकाने बाजी मारली. त्याबरोबरच भारताने सलग चौथ्यांदा ही मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. तर चौथा सामना फलंदाजांनी गाजवला. या मालिकेत झालेले रेकॉर्ड्स पुढीलप्रमाणे आहेत.

बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाज उस्मान ख्वाजा सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला. त्याने ४ सामन्यातील ७ डावांमध्ये ४७.५७ च्या सरासरीने एकूण ३३३ धावा फटकावल्या. यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता.

या मालिकेत सर्वाधिक बळी भारताचा आघाडीचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने टिपले. त्याने ४ सामन्यातील ८ डावांत मिळून १७.२८ च्या सरासरीने २५ विकेट्स काढल्या.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या कसोटी मालिकेत एका डावात सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम विराट कोहलीने केला. त्याने १५ चौकारांच्या मदतीने १८६ धावांची खेळी केली.

या मालिकेत एका डावात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा मान अक्षर पटेलने मिळवला. त्याने एका डावात सर्वाधिक ४ षटकार ठोकले होते.

एका डावात चौकार षटकारांच्या मदतीने सर्वाधिक धावा फटकावण्याचा मान उस्मान ख्वाजाने मिळवला. त्याने २१ वेळा चेंडू सीमापार धाडत ८६ धावा काढल्या.

एका डावात सर्वाधिक बळी घेण्याचा मान नाथन लियॉनने मिळवला. त्याने इंदूर कसोटीतील एका डावामध्ये ८ बळी टिपले होते.

तसेच एका सामन्यात सर्वाधिक विकेट्स काढण्याचा मानही नाथन लायननेच पटकावला. त्याने इंदूर कसोटीत ११ बळी टिपले होते.

भारताचा यष्टीरक्षक के.एस. भरत याने यष्ट्यांमागे सर्वाधिक बळी टिपण्याचा विक्रम केला. त्याने ८ फलंदाजांना माघारी धाडले.

या मालिकेत क्षेत्ररक्षण करताना सर्वाधिक झेल विराट कोहलीने पकडले. त्याने ५ झेल पकडले.

या मालिकेत उस्मान ख्वाजा आणि कॅमरून ग्रीन यांच्यामध्ये सर्वात मोठी भागीदारी झाली. त्यांनी पाचव्या विकेटसाठी २०८ धावांची भागीदारी केली.