Ind vs Aus 3rd test live : रवींद्र जडेजाने इतिहास घडविला! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 'भारी' विक्रम नोंदवला; ऑसींना दिला धक्का

India vs Australia 3rd test live score updates : मालिकेत २-० अशा पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने तिसऱ्या कसोटीत दमदार कामगिरी केली. भारताचा पहिला डाव १०९ धावांवर गुंडाळल्यानंतर त्यांनी २ विकेट गमावत १०८ धावा केल्या.

भारताचा पहिला डाव १०९ धावांवर गुंडाळल्यानंतर त्यांनी २ विकेट गमावत १०८ धावा केल्या. उस्मान ख्वाजाने अर्धशतकी खेळी करताना मार्नस लाबुशेनसह १९८ चेंडूंत ९६ धावांची भागीदारी केली. ऑसींच्या दोन्ही विकेट्स रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) घेतल्या आणि त्या जोरावर त्याने मोठा इतिहास घडविला.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मिचेल स्टार्कच्या पहिल्याच षटकात रोहित शर्मा दोन वेळा बाद होता, परंतु DRS न घेतल्याने तो मैदानावार टीकला. तरीही रोहित १२ धावांवर बाद झाला. शुबमन गिल ( २१), चेतेश्वर पुजारा ( १) व श्रेयस अय्यर ( ०) हेही माघारी परतले.

विराट कोहली व केएस भरत यांनी २५ धावांची भागीदारी केली. विराट ५२ चेंडूंत २२ धावांवर LBW झाला. बघता बघता भारताचा पहिला डाव १०९ धावांवर गडगडला. विराटने सर्वाधिक २२, गिलने २१ आणि केएस भरतने १७ धावा केल्या. मॅथ्यू कुहनेमन याने १६ धावांत ५ विकेट्स घेतल्या. नॅथन लियॉनने तीन, तर टॉड मर्फीने १ विकेट घेतली.

ट्रॅव्हीस हेड व उस्मान ख्वाज यांनी सावध खेळ करण्याचा प्रयत्न केला, परंतु रवींद्र जडेजाने धक्का दिला. सहाव्या षटकात जडेजाने ऑसी सलामीवीराला ( ९) पायचीत केले. त्याच षटकात जडेजाने मार्नस लाबुशेनची विकेट मिळवली होती. लाबुशेनचा फटका चुकला अन् चेंडू बॅटला लागून यष्टींवर आदळला. लाबूशेन बाहेर जात असताना अम्पायरने नो बॉलचा इशारा दिला.

रवींद्र जडेजासाठी कर्णधार रोहितने दोन वेळा DRS घेतला परंतु दोन्ही DRS वाया गेले. पण, जेव्हा अश्विनच्या गोलंदाजीवर मार्नस लाबुशेनसाठी DRS घेण्याची गरज होती तेव्हा रोहितने टाळले. नेमके त्याचवेळी रिप्लेत लाबुशेन वाद असल्याचा दिसला अन् रोहित खुदकन हसला. पहिले दोन DRS वाया गेल्याने रोहितने इथे DRS घेण्याचं धाडस दाखवलं नाही, परंतु तसे केले असते तर विकेट मिळाली असती.

रवींद्र जडेजानेच ही विकेट मिळवून दिली. ख्वाजासह भारतीया गोलंदाजांची डोकेदुखी वाढवणाऱ्या लाबुशेनला त्याने बाद केले. लाबुशेन ९१ चेंडूंत ३१ धावांवर त्रिफळाचीत झाला. रवींद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० विकेट्सचा टप्पा ओलांडला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५००+ विकेट्स व ५०००+ धावा करणारा रवींद्र जडेजा हा दुसरा भारतीय ठरला. यापूर्वी कपिल देव यांनी हा पराक्रम केला आहे. जडेजाने ६३ कसोटी, १७१ वन डे आणि ६४ ट्वेंटी-२० सामन्यांत अनुक्रमे २६२३, २४४७ व ४५७ धावा केल्या आहेत.