India Tour of England : रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणेसह भारतीय क्रिकेटपटू करतायेत सुट्टी एन्जॉय, पाहा Photo

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. या लढतीनंतर भारतीय संघ यजमान इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ४ ऑगस्टपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी भारतीय खेळाडूंना २० दिवसांची सुट्टी मिळाली आहे आणि या सुट्टीत खेळाडू कुटुंबीयांसह इंग्लंडमध्ये भटकंती करताना दिसत आहेत.