Why India's Campaign Ended Early at T20 World Cup 2021?: मेंटॉर म्हणून महेंद्रसिंग धोनी दिला, हवा तो खेळाडू दिला; तरीही टीम इंडियानं साखळीतच कसा गाशा गुंडाळला?

Why India's Campaign Ended Early at T20 World Cup 2021? - भारतीय संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अखेर विजयानं निरोप घेतला. अफगाणिस्तान, स्कॉटलंडपाठोपाठ नामिबियासारख्या दुबळ्या संघाला नमवून भारतानं विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. पण,

Why India's Campaign Ended Early at T20 World Cup 2021? - भारतीय संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अखेर विजयानं निरोप घेतला. अफगाणिस्तान, स्कॉटलंडपाठोपाठ नामिबियासारख्या दुबळ्या संघाला नमवून भारतानं विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. पण, या विजयाला काहीच अर्थ उरला नाही, कारण साखळी फेरीतील अखेरचा सामना खेळण्यापूर्वीच टीम इंडिया उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाद झाली होती. दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांना त्यांच्या घरी जाऊन मर्यादित षटकांच्या मालिकेत लोळवणारा भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा प्रबळ दावेदार होता. पण, पाकिस्तान व न्यूझीलंड या मातब्बर संघांनी विराट कोहली अँड कंपनीला जमिनीवर आपटले, तेही असे की त्यांना उठणे अवघड झाले.

बीसीसीआय, निवड समिती, विराट व मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी तगडा संघ निवडला. चार वर्षांनंतर आर अश्विनचे झालेले पुनरागमन सर्वांना बुचकळ्यात टाकणारे होते, परंतु त्यानं त्याची निवड सार्थ ठरवली. या संघाला विशेष आधार म्हणून मार्गदर्शक म्हणून महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) निवड केल्यानं टीम इंडियाला बूस्ट मिळाला. पण, त्याचवेळी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील विस्कटलेली घडी बसवण्यासाठी ही निवड केली गेली, अशी चर्चाही रंगली.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही आणि यावेळी तो दुष्काळ संपवतील असे वाटले होते, पण घडले अगदी उलट. जेतेपद सोडा तोपर्यंत पोहचण्यातही टीम इंडिया अपयशी ठरली. Super 12मध्ये तीन विजयांसह ६ गुणांची कमाई करत तिसऱ्या स्थानावरच अडकली. २०१२नंतर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच टीम इंडियाचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. जाणून घेऊयात भारताच्या पराभवाची कारणं...

आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वीच निवड समिती आणि कर्णधार विराट कोहली यांनी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी कोणते खेळाडू हवेत, हे निश्चित केले होते. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करूनही काही खेळाडू दुर्लक्षित राहिले. त्यापैकी एक म्हणजे युझवेंद्र चहल... राहुल चहर, वरुण चक्रवर्थी यांच्यापेक्षा चहलची यूएईतील कामगिरी सरस झाली होती. अखेरच्या क्षणापर्यंत त्याची निवड होईल, असे वाटत होते. पण, तसे काहीच घडले नाही. राहुल चहरला तर मुंबई इंडियन्सनं स्वतः संघातून वगळले होते.

भुवनेश्व कुमारसाठी आयपीएल काही खास राहिले नाही. त्यालाही थांबवले गेले, दुसरीकडे दीपक चहरनं पॉवर प्लेमध्ये चांगली कामगिरी करून चेन्नई सुपर किंग्सला जेतेपद पटकावून दिले, त्याला राखीव खेळाडूंमध्ये ठेवले. अष्टपैलू अक्षर पटेल याला अखेरच्या क्षणाला राखीव खेळाडूंत टाकले आणि शार्दूल ठाकूरला राखीव फळीतून मुख्य संघात घेतले. आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप विनर ऋतुराज गायकवाडकडेही दुलर्क्ष केले गेले.

पाकिस्तानविरुद्ध पहिल्याच सामन्यात १० विकेट्सनं दारूण पराभव पत्करल्यानंतर टीम इंडियानं काय केलं, तर भुवनेश्वर कुमारला बसवून शार्दूल ठाकूरला खेळवलं. अनफिट सूर्यकुमार यादवच्या जागी इशान किशनला खेळवलं. तरीही भारताला न्यूझीलंडनं ८ विकेट्स राखून लोळवलं. या सामन्यात फलंदाजीच्या क्रमवारीत केलेला प्रयोग टीम इंडियाच्या अंगलट आला. पाकिस्तान विरुद्ध शाहिन आफ्रिदी ( डावखुरा जलदगती गोलंदाज) नं रोहितला भोपळ्यावर माघारी पाठवले, म्हणून ट्रेंट बोल्टपासून त्याचा बचाव करण्यासाठी फलंदाजीची क्रमवारीच बदलली. इशान व लोकेश राहुल ही जोडी सलामीला आली. रोहित तिसऱ्या क्रमांकावर आला. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध पुन्हा रोहित व राहुल जोडी सलामीला खेळवली. नेमकं काय करावं, हेच विराट व संघ व्यवस्थापनाला कळत नव्हते.

निवड समितीनं राहुल चहर याची फ्रंटलाईन स्पिनर म्हणून निवड केली, पण त्याला संधी दिली कुठे? भारतीय संघ रवींद्र जडेजा व वरुण चक्रवर्थी या फिरकी जोडीवरच विसंबून राहिले. संघात आर अश्विनसारखा अनुभवी फिरकीपटू असूनही पाकिस्तान व न्यूझीलंड विरुद्ध वरुणला पसंती दिली. दोन सामने गमावल्यानंतर अश्विन प्लेइंग इलेव्हनमध्ये आला अन् त्यानं कमाल करून दाखवली. त्याचा मोठ्या सामन्यात वापर करता आला असता.

या संपूर्ण स्पर्धेत हार्दिक पांड्याची तंदुरुस्ती हाच सर्वांच्या चर्चेचा विषय होता. आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात एकही षटक न फेकलेल्या हार्दिकला वर्ल्ड कपसाठी अष्टपैलू म्हणून कसे दाखल केले गेले? बरं त्यानं फलंदाजीत क्रांतिकारक खेळी केली, असंही नाही. पाकिस्तानविरुद्ध तर त्यानं गोलंदाजी केलीच नाही आणि न्यूझीलंडविरुद्ध औपचारिकता म्हणून दोन षटकं फेकली.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर असताना विराटनं कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली. त्याचा नकारात्मक परिणाम संघावर झालेला पाहायला मिळाला. विराटला अखेरच्या आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत जेतेपद मिळवून देण्याचं दडपण खेळाडूंवर आलं आणि ते दडपण खेळाडू हाताळू शकले नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक, २०१९च्या वन डे वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक हे विराटचे कर्णधार म्हणून आयसीसी स्पर्धेतील यश... विराटनंही पहिल्या सामन्यानंतर आम्ही लढाऊ वृत्ती दाखवण्यात अपयशी ठरलो, हे मान्य केलं. पण, माजी कर्णधार कपिल देव यांनी त्यावरून विराटचे कान टोचले.

जसप्रीत बुमराह, आर श्रीधर आणि रवी शास्त्री यांनी हा मुद्दा प्रकर्षानं मांडला. मागील सहा महिन्यांपासून खेळाडू बायो बबलमध्ये आहेत आणि त्यामुळे ते मानसिक व शारीरिक थकले आहेत, असे शास्त्री म्हणाले. त्यात आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा आणि वर्ल्ड कप यांच्यामधील विश्रांतीचा वेळ फार कमी होता. भारतीय संघ मर्यादित षटकांची मालिका खेळूनही जमाना झाला होता आणि त्यामुळे पुन्हा ती घडी बसण्यासाठी खेळाडूंना वेळ मिळालाच नाही.